News Flash

पुण्यात गुंडाकडून पोलीस हवालदाराची हत्या

आरोपी प्रवीण महाजनविरोधात गुन्हा दाखल

प्रातिनिधिक छायाचित्र

पुण्यात गुंडाने पोलीस हवालदाराची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शहराचा मध्यभाग असलेल्या बुधवार पेठ परिसरातील फरासखाना पोलीस स्टेशनमधील हवालदाराचा गुंडाने चाकूने वार करून हत्या केली. हवालदाराची हत्या झाल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. प्रविण श्रीनिवास महाजन (३४) असं आरोपी गुंडाचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

फरासखाना पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, “मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या आम्हाला फोनवरून माहिती मिळाली होती. बुधवार केजळे चौकाजवळील ढमढेरे बोळात जाणार्‍या रोडवर हॉटेलसमोर एका व्यक्तीवर चाकूने वार झाले असल्याचं सांगण्यात आलं होतं. आम्ही काही मिनिटात घटनास्थळी पोहोचलो. यावेळी तिथे हवालदार समीर सय्यद रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. चौकशी केली असताना पव्या महाजनने हल्ला केल्याचे सांगण्यात आले”.

“आम्ही रस्त्यावरून जाणारी एक रुग्णवाहिका थांबवून समीर सय्यद यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी प्रवीण महाजनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,” अशी माहिती श्रीकांत सावंत यांनी दिली. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2021 7:39 am

Web Title: police constable murder in pune svk 88 sgy 87
Next Stories
1 ‘जेईई’ मुख्य परीक्षा लांबणीवर
2 उत्पादनांना मागणी असूनही पाचशेहून अधिक लघुउद्योग बंद
3 निर्बंध शिथिल झाल्यावरच ‘आरटीई’अंतर्गत प्रवेश प्रक्रिया
Just Now!
X