27 September 2020

News Flash

ओवेसींच्या पुण्यातील सभेला पोलीसांनी परवानगी नाकारली

ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीनचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे.

| February 2, 2015 11:41 am

ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादुल मुस्लीमीनचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या पुण्यातील सभेला पोलीसांनी परवानगी नाकारली आहे. शिवसेनेने यापूर्वीच या सभेविरोधात भूमिका घेतली होती. ओवेसी यांच्या भाषणामुळे हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या, तर शिवसेना सहन करणार नाही. सभा शिवसेनेच्यावतीने बंद पाडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे शहरप्रमुख विनायक निम्हण यांनी दिला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही या सभेविरोधात भूमिका घेतली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पोलीसांनी या सभेला परवानगी नाकारली.
काँग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे नाटक कंपनी- ओवेसी
अ‍ॅक्शन कमिटी महाराष्ट्र व मुलनिवासी मुस्लिम मंचच्या वतीने ४ फेब्रुवारीला पुण्यातील गोळीबार मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी ओवेसी सभा घेणार होते. मुस्लिम आरक्षण विषयावर ही परिषद होणार आहे. या परिषदेसह ओवेसी यांच्या भाषणासाठी पोलीसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, वानवडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी या सभेला परवानगी नाकारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2015 11:41 am

Web Title: police denied permission to owaisis rally in pune
टॅग Mim
Next Stories
1 सामान्यांकडून असामान्य कृती करून घेणारे बाबा हे युगपुरुष
2 मेक इन इंडिया यशस्वी करण्यासाठी तरूणांची मानसिकता बदलण्याची गरज
3 रेषांतून भाष्य साधणाऱ्या ‘मूकनायका’ला व्यंगचित्रांच्या माध्यमातून श्रद्धांजली
Just Now!
X