News Flash

वाहनचालकांना वाहतूक पोलिसांची दिवाळी भेट!

महिनाभरात हे कुपन कितीही वेळा वापरण्याची मुभा देण्यात आली असून खरेदीवर दहा टक्के सूट मिळणार आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

नियम पाळणाऱ्यांना ‘आभार’ कुपन आता एकापेक्षा अधिक वेळा वापरण्याची सुविधा : – वाहतुकीचे नियम पाळणाऱ्या पुणेकर वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून भेट देण्यात येणारे आभार कुपन आता महिनाभर वापरण्याची सुविधा देण्यात आली आहे. यापूर्वी आभार कुपन फक्त एकदाच वापरण्याची सूट देण्यात आली होती.

नियम पाळणाऱ्या वाहनचालकांना प्रोत्साहन देण्यासाठी कुपन भेट देण्याची योजना पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. नियम पाळणारे वाहनचालक तसेच ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दंड नाही, अशा वाहनचालकांना पोलिसांकडून हे कुपन भेट देण्यात येते. वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या शहरातील नामवंत व्यावसायिकांच्या दुकानात खरेदी केल्यास दहा टक्के कुपनधारकांना सूट मिळते. यापूर्वी हे कुपन फक्त एकदाच वापरण्याची मुभा देण्यात आली होती. यापुढील काळात आभार योजनेअंतर्गत भेट देण्यात येणारे कुपन शहरातील अनेक नामवंत दुकानांमध्ये वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. महिनाभरात हे कुपन कितीही वेळा वापरण्याची मुभा देण्यात आली असून खरेदीवर दहा टक्के सूट मिळणार आहे.

पोलिसांनी शहरातील ११५ नामवंत व्यावसायिकांना या योजनेत सहभागी करून घेतले आहे. शहरातील नामवंत मिठाई विक्रेते, उपाहारगृह, मॉल तसेच अन्य व्यावसायिक योजनेत सहभागी झाले आहेत, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी सांगितले.

या योजनेत वाहनचालक त्यांच्यावर खटला दाखल आहे की नाही, याबाबतची माहिती mahatrafficechallan.gov.in./payechallan  या संकेतस्थळाच्या माध्यमातून मिळवू शकतील. एखाद्या वाहनचालकावर खटला दाखल नसल्यास ते कुपन मिळवू शकतात. नागरिकांना नियम पाळण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून पोलिसांनी आभार कुपन भेट योजना राबविली आहे. – पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2019 1:46 am

Web Title: police gift diwali driver akp 94
Next Stories
1 राजकारणापलीकडचे आम्ही..
2 बंडखोरीमुळे २०१४ मध्ये जिंकलेल्या मनसेच्या एकमेव आमदाराचा यंदा पराभव
3 पुणे ग्रामीणमध्ये शिवसेना-भाजपाला मोठा फटका, १० पैकी ९ जागांवर आघाडीचा विजय
Just Now!
X