करोनाच्या संसर्गामुळे मैदान बंदचा आदेश

पुणे : शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील मैदान करोनाच्या संसर्गामुळे बंद करण्यात आले आहे. मैदान जरी बंद करण्यात आले असले, तरी दररोज सायंकाळी काही वरिष्ठ पोलीस अधिकारी फेरफटका मारण्यास येत आहे. सरावासाठी मैदान बंद करण्यात आले असले, तरी अधिकाऱ्यांना फेरफटका मारण्यास मोकळीक असल्याने मुख्यालयातील पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे.

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
High Court Takes Note of Petition Against Light Pollution from Tree Decorations in Mumbai sent notice to maharashtra government
झाडांवरील दिव्यांची सजावट प्रकाश प्रदुषणासाठी कारणीभूत, उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारसह मुंबई पालिकेला नोटीस
hardik pandya marathi news, hardik pandya mumbai indians marathi news
दोन सामने, दोन पराभव, दोन मोठ्या चुका! कर्णधार हार्दिक पंड्याचे डावपेच मुंबई इंडियन्ससाठी मारक ठरत आहेत का?
Jitendra Awhad allegation
अजित पवारांच्या आदेशाने कळव्यातील मैदानाला टाळे लागल्याचा जितेंद्र आव्हाडांचा आरोप; म्हणाले, “नको ती दादागिरी…”

शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील प्रशस्त मैदानावर दररोज विविध क्रीडाप्रकारांचा सराव केला जातो. पोलीस दलात नव्याने भरती झालेले पोलीस कर्मचारी तेथे धावणे तसेच अन्य क्रीडा प्रकारांचा सराव करतात. शहरात करोनाचा संसर्ग वाढत असल्याने सरावासाठी पोलीस मैदान बंद करण्यात आल्याचा आदेश पोलीस प्रशासन विभागाने काही दिवसांपूर्वी दिला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मैदान सरावासाठी बंद ठेवण्यात आले आहे. मैदान बंद असल्याने पोलीस कर्मचाऱ्यांचा सरावही बंद झाला आहे. सराव बंद झाल्याने काही पोलिसांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना नाराजी व्यक्त केली.

मैदान बंद केले असले, तरी दररोज सायंकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक गट मैदानावर चालण्यास येतो. सामान्य पोलिसांना सरावासाठी मैदान बंद करण्यात आले असले, तरी अधिकाऱ्यांना आदेशातून मोकळीक देण्यात आल्याने पोलिसांनी नाराजी व्यक्त केली. मैदान बंद करायचे असेल, तर सरसकट सर्वांना हा नियम लागू झाला पाहिजे. मात्र, अधिकाऱ्यांना सूट देण्यात आली आहे का, असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.

गृहविलगीकरणात फेरफटका

पोलीस मुख्यालयातील मैदानावर दररोज सायंकाळी एक वरिष्ठ अधिकारी नियमित फेरफटका मारायला येतात. सध्या अधिकारी गृहविलगीकरणात आहे. मात्र, विलगीकरणात असलेले अधिकारी महोदय दररोज न चुकता चालायला येतात, अशी तक्रार पोलिसांनी केली.