News Flash

पोलीस कर्मचाऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

आत्महत्या करण्यामागचे अद्यापपर्यंत समजू शकलेले नाही

पुणे शहरातील बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने शिवाजीनगर येथील पोलीस लाईनमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नाना हंडाळ (वय 40 रा शिवाजीनगर पोलिस लाईन) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस लाईनमधील ‘डी’ विंगमध्ये नाना हंडाळ हे कुटुंबासोबत राहत होते. तर ते बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नाईक पदावर कार्यरत होते. आज (शुक्रवार) संध्याकाळच्या सुमारास ते घरी आले असता, त्यांच्या घरी कुणीच नव्हते. यानंतर त्यांनी गळफास घेतला.

घटनेची माहिती आसपासच्या लोकांना समजताच त्यांनी नाना हंडाळ यांना जवळील रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आत्महत्ये मागील कारण अद्यापपर्यंत समजू शकले नसल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 9:16 pm

Web Title: police officer commits suicide by hanging himself at his residence msr 87 svk 88
Next Stories
1 Pooja Chavan Case : आता थेट न्यायालयात तक्रार दाखल, ५ मार्च रोजी आदेश येण्याची शक्यता!
2 पिंपरी-चिंचवड: तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत्यानेच केला लैंगिक अत्याचार
3 विज्ञान दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खास कार्यक्रमांचे आयोजन
Just Now!
X