22 October 2020

News Flash

पोलिसांनी वाचवले गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण

पोलिसांनी गळफास घेणाऱ्या तरुणाचे प्राण वाचवले

पुण्यातील कर्वेनगर भागात आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका तीस वर्षीय तरुणाचे प्राण पोलिसांनी वाचवले. रविवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा तरुण गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली घराचा दरवाजा तोडला आणि त्याला वाचवले.

पाहा व्हिडिओ 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, रविवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास एक महिला वारजे पोलीस ठाण्यात धावत आली आणि माझा मुलगा आत्महत्या करतो आहे, त्याला वाचवा असे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने धाव घेऊन घराचा दरवाजा तोडला असता या तरुणाने ओढणीने गळफास घेतला होता..पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता कात्रीने ओढणी कापून त्याला खाली उतरवले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे या मुलाच्या आईने पोलिसांचे आभार मानले आहेत. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 23, 2019 1:38 pm

Web Title: police save youth from suicide in karve nagar pune scj 81
Next Stories
1 पुणे – दुर्दैवी ! वाढदिवशीच त्याला गाठले मृत्यूने
2 पुणे – त्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या झाल्याचं निष्पन्न
3 शरद पवारांवर टीका करणं हा चंद्रकांत पाटील यांचा बालिशपणा-धनंजय मुंडे
Just Now!
X