News Flash

पुणे, लोणावळ्यात पर्यटकांवर कारवाई

सिंहगड किल्ला, खडकवासला धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हवेली पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली.

कार्ला, मळवली परिसरात रविवारी पर्यटकांवर कारवाई करून लोणावळा ग्रामीण पोलिसांनी त्यांना माघारी पाठविले.

पुणे / लोणावळा : पर्यटनस्थळी बंदीचे आदेश धुडकावून वर्षांविहारासाठी लोणावळा, खंडाळा तसेच मावळ तालुक्यात आलेल्या ४२१ जणांविरोधात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी रविवारी कारवाई करून त्यांच्याकडून दोन लाख ६२ हजारांचा दंड वसूल केला. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून पर्यटकांना माघारी पाठवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. मुंबई-पुण्यातील पर्यटकांची संख्या त्यात सर्वाधिक होती.

लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, भाजे लेणी, कार्ला लेणी, लोहगड किल्ला, पवना धरण परिसरात पर्यटक रविवारी (२० जून) दाखल झाले. पोलिसांनी या भागात नाकाबंदी करून रस्ते वाहतुकीस बंद केले होते. पर्यटकांना माघारी पाठवून त्यांच्याविरोधात दंडात्मक कारवाई केली, अशी माहिती लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.

पर्यटनस्थळ बंदी आदेशाचे काटेकोरपणे पालन केल्याने पर्यटनस्थळ निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळाले. लोणावळा शहर, ग्रामीण भागातील हॉटेल, बंगले, फार्म हाउस या ठिकाणी शासकीय नियमांचे पालन करून खोल्या आरक्षित करण्यास मुभा आहे. मात्र, पर्यटन स्थळे, मंदिरे, धबधबे, धरण परिसरात जाण्यास बंदी आहे. लोहगड, विसापूर, श्री एकवीरा देवी मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर नाकाबंदी होती.

खडकवासला, सिंहगड परिसरात कारवाई

सिंहगड किल्ला, खडकवासला धरण परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर हवेली पोलीस ठाण्याच्या पथकाने कारवाई केली. खडकवासला, गोळेवाडी परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. मुखपट्टी परिधान न करणे, आदेश भंग केल्याप्रकरणी १३२ जणांविरोधात कारवाई करून त्यांच्याकडून ४७ हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 2:54 am

Web Title: police take action against tourists in pune and lonavala zws 70
Next Stories
1 पुण्यात अजित पवारांच्या उपस्थित कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाला गर्दी; शहराध्यक्षांसह १०० ते १५० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
2 “दोन्ही दाढीवाल्यांचं शटर बंद करायचं एवढंच आपलं लक्ष्य”, नाना पटोलेंचा मोदींवर निशाणा!
3 स्वबळाच्या नाऱ्यानंतर काँग्रेस उद्धव ठाकरेंसोबत राहणार का? नाना पटोले म्हणतात…!
Just Now!
X