पिंपरी-चिंचवड शहरात तोडफोडीचे सत्र सुरू असून त्यात आता पोलिसांच्या अंगावर धावून पोलिसांना दमदाटी आणि अश्लील शिवीगाळ करण्यापर्यंत मजल टवाळखोरांची गेली आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सुरू होती. यावेळी दुचाकीवरून निघालेल्या दोघांना कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी मास्क न घातल्याने अडवले. यावेळी तरुणाने थेट अंगावर धावून जात दमदाटी करत पोलिसांना शिवीगाळ केली. हा सर्व प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.

अभिषेक राजू टेंकल (१८) आणि हरिश गणेश कांबळे (१८) यांना पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही पुण्यातील शिवाजीनगर येथे वास्तव्यास आहेत. हरिश कांबळे याच्यावर याअगोदर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात आयर्नमॅन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना वारंवार आरोपी आव्हान देत असल्याचे समोर येत आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवारगार्डन येथे पोलीस कर्मचारी विनामास्क वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत होते. तेव्हा, दुचाकी वरून आलेल्या आरोपी अभिषेक टेंकल आणि हरीश कांबळे या दोघांना पोलीस कर्मचाऱ्याने अडवले. मात्र, अरेरावी करत थेट पोलिसांची कॉलर आरोपीने धरून अश्लील शिवीगाळ करत दमदाटी केली. तुझ्या अंगावर वर्दी आहे म्हणून नाहीतर इथे दाखवलं असतं अशा पद्धतीने आरोपी धमकावतही होता.

आरोपी टेंकलला पोलीस कर्मचारी संयमाने समजावण्याचा प्रयत्न करत होते मात्र, तो अश्लील भाषेत शिवीगाळ करतच होता. हा सर्व प्रकार तेथील एका नागरिकाने आपल्या मोबाइलमध्ये चित्रित केला असून तो लोकसत्ता ऑनलाइनच्या हाती लागला आहे. एकीकडे पोलीस आयुक्त गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याची भाषा करत असताना मात्र दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांची कॉलर पकडण्यापर्यंत आरोपीची मजल जात आहे.