News Flash

पुण्यात पोलिसाच्या पत्नीची दोन वर्षांच्या मुलाची हत्या करुन आत्महत्या

जान्हवी या हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांच्या पत्नी होत्या.

जान्हवी कांबळे या हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांच्या पत्नी होत्या.

पुण्यातील मगरपट्टा हडपसर येथे सासूच्या छळास कंटाळून पोलिसाच्या पत्नीने आपल्या दोन वर्षांच्या मुलाचा खून करून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा हडपसर पोलीस तपास करीत असून जान्हवी अमित कांबळे आणि शिवांश अशी  मृतांची नावे आहेत.

जान्हवी कांबळे या हडपसर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांच्या पत्नी होत्या. अमित हे हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकात (डीबी) कार्यरत आहेत. अमित आणि जान्हवी या दाम्पत्याला शिवम (दोन वर्ष) हा मुलगा आहे. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास जान्हवी यांनी राहत्या घरी बेडरुममध्ये मुलाची हत्या करुन आत्महत्या केल्याचे उघड झाले.

आत्महत्येपूर्वी जान्हवी यांनी पतीला उद्देशून चिठ्ठी लिहून ठेवली होती. यात त्यांनी म्हटले होते की, ‘अमित तू माझ्यावर प्रेम करतो, पण मला वेळ देऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. सासू सुजाता ही माझा छळ करते.’ पोलिसांनी आता या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2018 12:15 pm

Web Title: police wife kills two year old son later commit suicide in hadapsar
Next Stories
1 कांदा दराचा शेतकऱ्यांसह ग्राहकांनाही फटका
2 सुसज्ज, सुंदर पुण्याचा ई-प्रवास
3 नसरुद्दीन शाह यांनी बोलून दाखवलेली खंत योग्यच-काँग्रेस
Just Now!
X