05 March 2021

News Flash

विद्रुपीकरणाचा कळस

प्रत्यक्षात मात्र कारवाई करताना महापालिका प्रशासनाला राजकीय दबावाला बळी पडावे लागत आहे.

इच्छुकांच्या उत्साहामुळे शहरात जागोजागी फलकबाजी

महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर इच्छुकांकडून फलकबाजीच्या माध्यमातून जोरदार चमकोगिरी सुरु झाली आहे. निवडणुकीचा अप्रत्यक्ष प्रचार करण्यासाठी शहरात जागोजागी फ्लेक्स उभारण्यात आले असून त्यामुळे संपूर्ण शहर विद्रूप झाले आहे. शहराचे विद्रूपीकरण थांबविण्यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र राजकीय पक्षांनी न्यायालयात सादर केले असले तरी कार्यकर्त्यांकडून मात्र त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. महापालिकेकडून होत असलेली दिखाऊ कारवाई आणि राजकीय दबावामुळेच विनापरवाना फ्लेक्स, होर्डिग आणि बॅनर्स उभारणीला कार्यकर्त्यांना बळ मिळत असल्याचेही दिसून येत आहे. शहराचे विद्रूपीकरण होत असातनाही गेल्या सात महिन्यात अवघे सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

pun02शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर तसेच छोटय़ा रस्त्यांवरही बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिग्ज उभारण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागाकडून मान्यता घ्यावी लागते. मात्र परवानगी न घेताच शहरात मोठय़ा प्रमाणावर विविध कारणांसाठी फ्लेक्स, होíडंग्जची उभारणी होत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. वाढदिवस, निवड-नियुक्ती पुरते मर्यादित असलेले हे प्रमाण पालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे लक्षणीयरीत्या वाढले आहे. सिग्नल, उड्डाणपूल, गल्लीबोळात इच्छुक उमेदवारांच्या विविध उपक्रमांची, स्पर्धाची माहिती या बेकायदेशीर फ्लेक्सद्वारे देण्यात येत आहे.

शहराचे विद्रूपीकरण करू नका, विद्रूपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा असे प्रत्येक राजकीय पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून सातत्याने सांगण्यात येते. मात्र नेतेमंडळींचे हे सल्ले तोंडदेखलेच असतात. प्रत्यक्षात मात्र कारवाई करताना महापालिका प्रशासनाला राजकीय दबावाला बळी पडावे लागत आहे. इच्छुकांकडूनही त्यांच्या नेत्यांचीच छायाचित्रे फ्लेक्समध्ये वापरली जात आहेत. भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर सैनिकांचे अभिनंदन करण्यासाठी फ्लेक्स लावण्यात आले असून त्या बरोबरच वाढदिवसाचे फलक, अल्प दरात भोजन, भाजीपाला विक्री, स्वस्तात गॅस सिलिंडर अशा उपक्रमांच्या जाहिरातीही निवडणुकीमुळे इच्छुकांकडून सुरु झाल्या आहेत.

विनापरवाना फ्लेक्स, होर्डिग्ज, बॅनर्स उभारण्यात आल्यास वेळोवेळी कारवाई करण्यात यावी, फ्लेक्स लावणाऱ्यांवर फौजदारी खटले दाखल करण्यात यावेत, महापालिका प्रशासनाबरोबरच पोलिसांनीही स्वत:हून गुन्हे दाखल करावेत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मात्र पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हे दाखलच होत नाहीत. तर, कारवाई करताना महापालिकेला राजकीय दबावाला सामोरे जावे लागते. त्यातून अनधिकृत फ्लेक्स उभारणीला बळ मिळत असल्याचेही दिसून येत आहे. शहरातील फ्लेक्स, बोर्ड, होर्डिग्ज, झेंडे, पोस्टर, किऑक्स यांची अधिकृत आणि अनधिकृत संख्या किती आहे, याची कोणतीही माहिती प्रशासनाकडे नाही. तसेच गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीतील कारवाई करण्याचे प्रमाणही कमी कमी झाल्याचे महापालिकेच्याच आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 3:19 am

Web Title: political hoarding hit pune city
Next Stories
1 महेश लांडगे यांचा नगरसेवकपदाचा राजीनामा
2 शहरात ‘टुरिस्ट टॅक्सीं’च्या संख्यावाढीला वेग!
3 अपात्रतेच्या भीतीने नगरसेविकेचा छुपा भाजप प्रवेश
Just Now!
X