लिलाव थांबवले, व्यवहारही थंडावले

पाचशे व हजार रुपयांच्या नोट रद्द करण्यात आल्यामुळे त्याचा मोठा फटका इंदापूर तालुक्यातील डाळिं.ब उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. रोज होणारे लाखो रुपयांचे व्यवहार रोखीने कसे करायचे हा प्रश्न डाळिं.ब खरेदी-विक्री करणाऱ्या व्यापारी वर्गाला भेडसावत आहे. इंदापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये होणारा डाळिं.ब बाजारातील लिलाव व्यवहार सुरळीत होईपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे डाळिं.ब उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

खरेदी होत नसल्यामुळे तोडणीला आलेल्या लाखो रुपये किमतीच्या डाळिंबाचे करायचे काय, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणाऱ्या व्यवहारांसाठी तातडीने स्वतंत्र व्यवस्था करावी, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. बाजारात माल घेऊन येणारे शेतकरी मालाच्या विक्रीनंतर चलनातील नव्या नोटा मागत असल्यामुळे आणि खरेदी केलेल्या डाळिं.बाला बाजारात रोखीचे ग्राहक नसल्यामुळे व्यापाऱ्यांचीही दुहेरी कोंडी झाली आहे. त्या बरोबरच शेतकरीही भरडला जात आहे.

इंदापूर तालुका डाळिं.बाचे आगार असून गेल्या वर्षीच्या दुष्काळात शेतकरी वर्गाने लाखो रुपयांचे कर्ज घेऊन डाळिं.ब जगवले. सध्या बाजारात डाळिं.बाला दरही चांगला होता. मात्र मोठय़ा प्रमाणात रोखीचे व्यवहार करणे अवघड झाल्याने परिस्थिती कठीण झाली असून यातून मार्ग निघण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर या जिल्ह्य़ांना अंतराच्या दृष्टीने इंदापूर येथील बाजार सोयीस्कर असल्यामुळे येथे आठवडय़ातून तीन दिवस येथे डाळिं.बाचे लिलाव होतात. बाजारात हजारो कॅरेट डाळिं.बाची आवक होऊन लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र नोटा रद्द झाल्यामुळे ही उलाढाल बंद झाली आहे. बाहेरच्या राज्यातील डाळिं.ब व्यापारी शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन बागेत डाळिं.ब खरेदी करतात. या व्यवहारातून हजारो टन डाळिं.ब देशाच्या कानाकोपऱ्यात जातात. त्यातून मोठी उलाढाल होते.

मात्र रोखीचे व्यवहार करणे सध्या शक्य होत नसल्यामुळे बागेतील खरेदीही थांबली आहे. तोडणीला आलेल्या डाळिं.बाची तोडणी वेळीच न झाल्यास ती डाळिंबे गळून पडून मोठे नुकसान होते.