News Flash

Pooja Chavan Case : आता थेट न्यायालयात तक्रार दाखल, ५ मार्च रोजी आदेश येण्याची शक्यता!

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुण्यामध्ये खासगी तक्रार दाखल करण्यात आला आहे. येत्या ५ मार्च रोजी यासंदर्भात न्यायालयाचे आदेश येऊ शकतात.

(संग्रहित छायाचित्र)

७ फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण हिने आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे करण्यात आले आहेत. नुकताच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील जाहीर पत्रकार परिषद घेऊन पुणे पोलीस योग्य दिशेने तपास करत नसल्याचा आरोप केला आहे. घटनेच्या जवळपास ३ आठवड्यांनंतर देखील पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न केल्यामुळे त्याविरोधात आता पुण्यात थेट न्यायालयातच तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुण्यातील वकिलांच्या जस्टीस लीग सोसायटीमार्फत भक्ती राजेंद्र पांढरे यांनी अ‍ॅड. विजय ठोंबरे यांच्यामार्फत लष्कर न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी प्रमुख मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. युक्तिवादानंतर तक्रारीवर निर्देश देण्यासाठी ५ मार्च तारीख न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी

पूजा चव्हाण प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नसताना विरोधकांनी या मुद्द्याचं भांडवल करायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस योग्य पद्धतीने तपास करत नसल्याचा देखील दावा केला जात आहे. ‘प्रसारमाध्यमांमध्ये आणि वृत्तपत्रांमध्ये या प्रकरणावरून मोठी चर्चा सुरू आहे. पूजा चव्हाण हिचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला. पूजाच्या अनेक ऑडिओ क्लिप देखील व्हायरल होत असून त्यामध्ये अनेक मोठ्या व्यक्तींची नावे समोर येत आहेत. तरीदेखील त्याचा सखोल तपास होत नसून आरोपी कधीही मृत्यूबाबतचे पुरावे नष्ट करू शकतात’, असं देखील तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना तातडीने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

pooja chavan plea in pune court

“बदनामी थांबली नाही तर आम्हाला आत्महत्याच करावी लागेल”, पूजा चव्हाणच्या वडिलांचा इशारा!

बदनामीमुळे पूजाचे कुटुंबीय व्यथित

पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणावरून सुरू असलेल्या चर्चेमुळे पूजाचे कुटुंबीय व्यथित झाले आहेत. “पूजाची बदनामी थांबवा नाहीतर आत्महत्या करावी लागेल”, अशी व्यथित प्रतिक्रिया पूजाच्या वडिलांनी दिली आहे. तसेच, “कोणताही पुरावा नसताना फक्त फोटो जोडून त्यावरून रोज नवीन चर्चा केली जात आहे”, असा देखील आरोप त्यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2021 5:46 pm

Web Title: pooja chavan suicide case plea file in pune by justice league pmw 88
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड: तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत्यानेच केला लैंगिक अत्याचार
2 विज्ञान दिनानिमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खास कार्यक्रमांचे आयोजन
3 पन्नासपेक्षा जास्त वऱ्हाडी जमविल्यास ५० हजारांचा दंड
Just Now!
X