बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. या आत्महत्येवरून प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने महाविकास आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात नाव आलेल्या मंत्र्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपाकडून केली जात आहे. या मुद्द्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. “पूजा चव्हाण आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,” असं पाटील म्हणाले होते. त्याला शरद पवारांनी टोला लगावत प्रत्युत्तर दिलं आहे.

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणानंतर राज्यात पूजा चव्हाण प्रकरणात एका मंत्र्याचं नाव चर्चिलं जात आहे. भाजपाच्या काही नेत्यांकडून त्या नेत्याचा थेट उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाचे नेतेही आक्रमक झालेले दिसत आहे. याच प्रकरणावरून ‘पूजा चव्हाण आत्महत्या आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत?,’ असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता. पाटलांच्या विधानाचा हवाला देत शरद पवार यांना त्यांची भूमिका विचारण्यात आली. त्यावर शरद पवार म्हणाले,”त्या लोकांबद्दल मी बोलायचं का? ज्यांना आपला गाव सोडून बाहेर दुसरीकडं जावं लागतं… त्यांच्या बद्दल मी काय बोलणार?,” असा खोचक टोला पवारांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे. पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
bjp mp ramdas tadas
“मला लोखंडी रॉडने मारलं, माझ्यावर…”, भाजपा खासदार रामदास तडस यांच्या सुनेचे गंभीर आरोप
baramati lok sabha marathi news, sharad pawar reply to ajit pawar marathi news
शरद पवारांचा अजित पवारांवर पलटवार : म्हणाले, ‘तुमच्या धमक्यांना भीक न घालणारी ही अवलाद…’
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

ठाकरे-फडणवीस आमनेसामने…

पूजा चव्हा प्रकरणावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल, असं म्हटलं होतं. मागील काही दिवसात काहींना आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे सखोल चौकशीनंतर कारवाई केली जाईल, असं ठाकरे म्हणाले होते. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रकरणाचं गांभीर्य नसल्याची टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्या ऑडिओ क्लिप्स ऐकाव्यात म्हणजे कोण आयुष्यातून उठलं हे कळेल असा सल्ला फडणवीसांना दिला आहे.