रुपेरी पडद्यावरच्या कारकीर्दीची सात दशके पूर्ण करीत असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांना यंदाचा प्रभात जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रभात फिल्म कंपनीच्या काळाशी प्रत्यक्ष संबंधित असलेले स्थिरछायाकार बबनराव वाळवेकर आणि कपडेपट सहायक दत्तोबा भाडळे या दोन ज्येष्ठांना प्रभातचे शिलेदार सन्मान जाहीर झाला आहे.
प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनादिनाचे औचित्य साधून रविवारी (१ जून) बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात सुलोचनादीदी यांच्यासह वाळवेकर आणि भाडळे यांना गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात सवरेत्कृष्ट चित्रपट, संगीत, अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, कथा, पटकथा, छायाचित्रण आदी विविध २७ गटांतील प्रभात चित्रपट पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे, असे विवेक दामले यांनी कळविले आहे.