News Flash

“मुख्यमंत्री कुठेच दिसत नाहीत, मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात; जे काही…”

"अजित पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?"

१२ आमदारांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडीकडून सातत्याने राज्यपालांवर टीका होत आली आहे. शिवसेनाही सातत्याने टीका करत असून, भाजपाने संजय राऊत यांनाही सवाल केला आहे. (फोटो सौजन्य : Twitter/AjitPawarSpeaks वरुन साभार)

वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या करोना कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री कुठेच आणि कोणाशीही चर्चा करताना दिसत नाही. मला तर अजित पवारच मुख्यमंत्री वाटतात. जे काही जाहीर करायचं असतं, ते अजित पवारच जाहीर करतात. अजित पवार मला डी फॅक्टो मंत्री वाटतात असंही आंबेडकर यांनी म्हटलं आहेत.

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. त्यावर “अजित पवार म्हणतात की, रेमडेसिविर राज्य शासन इम्पोर्ट करणार आहे. पण शासनाला तसे अधिकार नाही. त्यामुळे अजित पवार कोणत्या अधिकाराने बोलत आहेत?,” असा सवाल देखील अंबेडकर यांनी उपस्थित केला.

राज्यात करोनाबाधित रुग्ण वाढत आहे. लॉक डाउनमधून ही चेन मोडणार नाही. त्याऐवजी जो पहिला रुग्ण आढळतो. तो किती जणांना भेटला आणि ती व्यक्ती पुढे किती लोकांना भेटली. यांच्यावर कामावर करणारी यंत्रणा निर्माण केली पाहिजे. जर तसे केल्यास चेन तोडणे शक्य होईल, अशी भूमिका अंबेडकरांनी मांडली.

…तर आम्ही राज्यभरात आंदोलन करणार

सिरम इन्स्टिट्यूटची ज्या देशांनी आपल्या येथून लस घेतली. त्या सर्वांना तीन डॉलर ते पाच डॉलरमध्ये उपलब्ध झाली आहे. मात्र ज्या देशात आणि आपल्या पुण्यात उत्पादन होणारी लस आपल्या सर्वांना जवळपास १२०० रुपयांना लस मिळणार आहे. हे चुकीचे असून यातून केंद्र सरकारची भूमिका काय आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आम्ही सरकारला आठवड्याभराची मुदत देत आहोत. ही लस आम्हाला, सरकारला मिळणार्‍या १५० रुपयात मिळावी. याबाबत निर्णय जाहीर करावा, अन्यथा आम्ही आठवड्याभरानंतर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विरोधात आंदोलन करू, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2021 2:13 pm

Web Title: prakash ambedkar slams chief minister and ajit pawar svk 88 scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 धक्कादायक:- करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार घेतले जातात!
2 करोना विळख्यात तमाशा कलावंतांची उपासमार
3 वादळी पावसाची शक्यता
Just Now!
X