25 November 2020

News Flash

राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी वारे गतिमान

नैर्ऋत्य मोसमी वारे गतिमान

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांसाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली असल्याने ते केरळच्या दिशेने गतिमान झाले आहेत. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने आजपासून कोकण विभागासह राज्यात काही ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

अंदमान समुद्रामध्ये १७ मे रोजी दाखल झालेल्या मोसमी वाऱ्यांचा प्रवास दहा दिवस थांबला होता. त्यानंतर बंगालच्या उपसागरातून पोषक स्थिती निर्माण झाल्याने मोसमी वाऱ्यांचा प्रवास पुन्हा सुरू झाला. अरबी समुद्र ते केरळ आणि लक्षद्विप ते केरळची किनारपट्टी या भागामध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोसमी वाऱ्यांना चालना मिळून त्यांनी अरबी समुद्रातील वाटचाल सुरू केली आहे. ही स्थिती लक्षात घेता मोसमी पाऊस १ जूनपर्यंत केरळात दाखल होण्याचे वातावरण निर्माण झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

येत्या ४८ तासांमध्ये दक्षिण अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे. त्यामुळेही मोसमी वाऱ्यांच्या प्रवासाला गती मिळणार आहे. कमी दाबाचा हा पट्टा तीव्र होण्याची शक्यता आहे. परिणामी कोकण किनारपट्टीवर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातही सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ३ जूनपर्यंत राज्याच्या विविध भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2020 3:20 am

Web Title: pre monsoon rain forecast in the maharashtra zws 70
Next Stories
1 सातत्याचे श्रेय स्थानिक कर्मचारी, यांत्रिकीकरणाचे! 
2 सोलापुरच्या उपमहापौरांना शिंका आणि खोकला येत असल्याने सांगवी पोलिसांनी सोडले
3 पुण्यात दिवसभरात १०८ करोना बाधित रुग्ण, ८ जणांचा मृत्यू
Just Now!
X