News Flash

पिंपरीत आज अजितदादांच्या उपस्थितीत नगरसेवकांची बैठक; महापौर बदलावर निर्णय?

पिंपरी महापालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (२८ नोव्हेंबर) होणार आहे

| November 28, 2015 03:19 am

पिंपरी महापालिकेच्या विविध विकासकामांचा प्रारंभ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (२८ नोव्हेंबर) होणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी नगरसेवकांची बैठकही आयोजित करण्यात आली आहे. या वेळी होणाऱ्या नगरसेवकांच्या बैठकीत महापौर बदलासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे.
शनिवारी सकाळी नऊ वाजता सांगवी फाटा येथील ‘सब-वे’ चे उद्घाटन होणार असून साडेनऊ वाजता पिंपळे सौदागर येथे नाशिकफाटा ते वाकड या बीआरटी मार्गाचे उद्घाटन होणार आहे. साडेदहा वाजता चिंचवडच्या चापेकर चौकात सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन होणार आहे. सकाळी पावणेअकरा वाजता चिंचवड येथील कृष्णाजी चिंचवडे पाटील शैक्षणिक संकुल, तसेच अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा केंद्राचे उद्घाटन अजितदादांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पिंपरीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची बैठक होणार आहे. बैठकीत शरद पवार यांच्या गौरवार्थ आयोजित कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. याशिवाय, पिंपरीच्या महापौर व उपमहापौरांची मुदत संपली असल्याने या विषयावरील निर्णायक चर्चाही अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 3:19 am

Web Title: presence corporators meeting mayor ajit pawar
टॅग : Corporators,Mayor,Meeting
Next Stories
1 कार्तिकी यात्रेतील दर्शनबारीत भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य
2 द्रुतगती महामार्गावरील वाढते अपघात चिंताजनक – मुख्यमंत्री
3 वनांतील पाणवठय़ांना आता सौर कूपनलिकांचे पाणी!
Just Now!
X