News Flash

पूर्वमोसमी पावसाची हजेरी

पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

पुणे : कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोसळणाऱ्या पूर्वमोसमी पावसाने सोमवारी सकाळपर्यंत जिल्ह्यातील १२ धरणांमध्ये हजेरी लावली. शहरासह जिल्ह्यातील काही भागात गेल्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या राज्याच्या विविध भागात पावसाळी वातावरण आहे. रविवारी रात्री जिल्ह्यातील १२ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
पुणे वेधशाळेने दिलेल्या अंदाजानुसार शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस आकाश ढगाळ राहून मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे आणि येडगाव धरणक्षेत्रांत प्रत्येकी दहा मिलिमीटर, माणिकडोह सहा मि.मी., वडज २४ मि.मी, डिंभे तीन मि.मी, विसापूर आठ मि.मी., खडकवासला चार मि.मी., गुंजवणी, नीरा देवघर आणि घोड धरणक्षेत्रांत प्रत्येकी दोन मि.मी., भाटघर सात मि.मी. आणि नाझरे २६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये पुरेशा प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. तब्बल आठ धरणांमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच यंदा ऐन उन्हाळ्यात ढगाळ हवामान असल्याने धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन कमी होत आहे. त्यामुळे पावसाळ्यापर्यंत मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध राहणार आहे.
खडकवासला धरणसाखळीतील उपलब्ध पाणीसाठा टीएमसी
टेमघर ०.४५ (१२.१५ टक्के), वरसगाव ५.३९ (४२.०७), पानशेत ५.५८ (५२.३७) आणि खडकवासला ०.४७ (२३.९८) असा एकू ण ११.९० अब्ज
घनफू ट (टीएमसी) म्हणजेच ४०.८० टक्के पाणीसाठा खडकवासला धरणसाखळी प्रकल्पांत शिल्लक आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:01 am

Web Title: presence of pre monsoon rains akp 94
Next Stories
1 कोट्यवधींची खरेदी संगनमताने
2 विभागीय रुग्णालयांची कामे तातडीने पूर्ण करा!
3 अनावश्यक विकासकामे थांबवून लसीकरण करण्याची शिवसेनेची मागणी
Just Now!
X