News Flash

पोलीस असल्याच्या बतावणीने ज्येष्ठ नागरिकाला गंडा

नवनाथ लोकरे (वय ६६, रा. कात्रज) यांनी यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

पोलीस असल्याच्या बतावणीने चोरटय़ांनी ज्येष्ठ नागरिकाकडील दहा हजारांची रोकड लांबविल्याची घटना धनकवडी भागात घडली.

नवनाथ लोकरे (वय ६६, रा. कात्रज) यांनी यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.लोकरे सोमवारी दुपारी धनकवडी भागातून निघाले होते. त्या वेळी चोरटय़ाने त्यांना अडवले आणि पोलीस असल्याची बतावणी केली. या भागात चोरटे आले आहेत. रोकड काढून सुरक्षित ठेवा, अशी बतावणी केली. लोकरे यांना बोलण्यात गुंतवून चोरटय़ांनी त्यांच्याकडील दहा हजारांची रोकड  लांबवली. सहायक फौजदार आर. पी. कदम तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 5:47 am

Web Title: pretense to a senior citizen by pretending to be a policeman
Next Stories
1 एमपीएससी परीक्षांसाठी एकच ओळखपत्र पुरेसे
2 पिंपरी पोलीस आयुक्तालयाचा स्वतंत्र कारभार आजपासून
3 गंमतघरातून विद्यार्थ्यांना शिक्षणप्रेरणा
Just Now!
X