News Flash

पंतप्रधान मोदींनी तासभर सिरम इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकांबरोबर केली चर्चा

याआधी दोन लस प्रकल्पांना दिली भेट....

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुण्याच्या इन्स्टीट्यूटला भेट दिली. अहमदाबाद, हैदराबाद नंतर ते पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटमध्ये आले. पंतप्रधानांनी सिरम इन्स्टीट्यूटमधील वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांबरोबर तासभर चर्चा केली. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पूनावाल कुटुंबीय तिथे उपस्थित होते. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे.

सध्या सर्वांचच लक्ष सिरम इन्स्टीट्यूटकडे लागलं आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे. पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींनी सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. मोदींनी यावेळी करोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करोना लशीची निर्मिती सुरु असलेल्या तीन प्रकल्पांना भेट देत आहेत. मोदींनी सर्वप्रथम अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली. इथे झायकोव्ही-डी लशीची निर्मिती सुरु आहे. ही स्वदेशी लस आहे. पंतप्रधान मोदींनी आज इथे स्वत:हा भेट देऊन लस निर्मिती आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला आहे.

पंतप्रधान मोदी आता पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये येऊन कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.

आसाराम बापूच्या सुटकेसाठी सिरम इन्स्टीट्यूटबाहेर निदर्शने
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटमध्ये असताना सिरम कंपनी बाहेर आसाराम बापूच्या समर्थकांनी निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. आसाराम बापू निर्दोष आहेत. त्यांची सुटका करावी अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. सिरम इन्स्टीट्यूटबाहेर बॅनरबाजी करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

झायडस कॅडिलाला भेट दिल्यानंतर मोदी म्हणाले….
“आज अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कचा दौरा करुन, स्वदेशी DNA आधारीत लशीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचे मोदींनी कौतुक केले. या प्रवासात भारत सरकार त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे” असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. मोदींनी लस निर्मितीचे काम समजून घेताना झायडसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 4:39 pm

Web Title: prime minister narendra modi pune visit serum institute serum institute dmp 82
Next Stories
1 कमालच झाली ! मंचरमधील शेतकऱ्यानं घेतलं ५६ कांड्याच्या २२ फुटी ऊसाचं उत्पन्न 
2 सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का?; चंद्रकांत पाटलांचा चिमटा
3 पुणे : मोदींच्या स्वागताला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार नाहीत
Just Now!
X