पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची पेट्रोल पंपावरील जाहिरात बंद करावी. त्या जाहिरातीतून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या करातून जाहिरात केली जात आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस दरवाढ ही सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारी असल्याचं राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय. त्या चिंचवडमध्ये बोलत होत्या. यावेळी त्यांनी पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीचा निषेध करत मोदींच्या फलकाखाली चूल आणि गॅस मांडून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.
यावेळी त्या म्हणल्या की, 500 रुपयांचा सिलेंडर आज 800 रुपयांना घ्यावा लागत आहे. फेब्रुवारी महिन्यात केलेली दरवाढीची तिसरी वेळ आहे. केंद्रसरकार ने महाराष्ट्राच्या जनतेच्या खिशावर टाकलेला हा दरोडा आहे. पेट्रोप पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. घरगुती गॅस दरवाढ झालेली सहन केली जाणार नाही.
पुढे त्या म्हणाल्या की, “पेट्रोल पंपावरील जाहिरात प्रधान नरेंद्र मोदी यांनी बंद करावी. जनतेने भरलेल्या करातून ही जाहिरात करण्यात येते. पेट्रोल पंपावरील जाहिरात जनतेची दिशाभूल करणारी आहे. या जाहिरातीतून ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्या दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याचा आम्ही निषेध करतो. गॅस दरवाढ झाल्याने महिलांच महिन्यात आर्थिक गणित बिघडलं आहे. सर्वसामान्यांच महागाई ने कंबरडे मोडले आहे”
चित्र वाघ यांना राजकीय पक्षांबद्दल आकस आणि द्वेष का?
चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत्या त्या वेळी भाजपा सूडबुद्धीने कारवाई करत आहे असं सांगत होत्या. आता त्या भाजपामध्ये गेल्या आहेत तर महाविकासआघाडीच सरकार सूडबुद्धीने कारवाई करत आहे, अस त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष त्याच्यासोबत असं कसे वागतात? प्रत्येक राजकीय पक्षाबद्दल आकस आणि द्वेष का आहे? असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2021 2:28 pm