News Flash

पिंपरी चिंचवडमध्ये प्राचार्यांची तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

सोमवारी रात्री १० वाजताची घटना

(संग्रहित छायाचित्र)

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औंधमध्ये घडली आहे. सोमवारी रात्री १० वाजता ही घटना घडली. गजानन वैजनाथ पारीश्वाड (वय ६०) असं या प्राचार्याचं नाव आहे. आत्महत्येचं कारण मात्र, समजू शकलं नाही.

प्राचार्य गजानन पारिश्वाड हे औंधमधील नागरस रोडवरील हर्ष पॅराडाईज सोसायटीमध्ये वास्तव्याला होते. सोमवारी (२८ डिसेंबर) रात्री १० वाजता इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. त्यावेळी सुरक्षा रक्षकाच्या हे निदर्शनास आले. त्याने तात्काळ सोसायटीतील नागरिकांना याची माहिती दिली.

सोसायटीतील एका डॉक्टरने त्यांची तपासणी केली. गंभीर मार लागल्यानं ते बेशुद्ध झाले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पारिश्वाड यांनी का आत्महत्या केली, हे अजून कळू शकलेलं नाही. पारिश्वाड यांची दोन्ही मुले जर्मनी आणि स्वीडनमध्ये वास्तव्यास आहेत. ते पत्नीसमवेत औंधमध्ये राहत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 4:36 pm

Web Title: principle commit suicide in pimpri chinchwad bmh 90
Next Stories
1 महागड्या बाईक चोरणाऱ्या आरोपीला बेड्या, यु-ट्यूबवरुन घ्यायचा बाईक चोरीचे धडे
2 ३१ डिसेंबरला पुण्यात Food Home Delivery वरही निर्बंध; जाणून घ्या काय आहे नवा आदेश
3 रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा
Just Now!
X