15 February 2019

News Flash

प्रीतम मुंडे समर्थकांची फेसबुक लाइव्ह करत शिक्षकाला मारहाण

मुंडे सर्मथकांनी संबंधित शिक्षकाला बोलवून घेतले आणि फेसबुक लाइव्ह करत माफी मागायला लावली. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केली.

पिंपरी-चिंचवड येथे एका शिक्षकाला फेसबुक लाइव्ह करत मारहाण झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे.

पिंपरी-चिंचवड येथे एका शिक्षकाला फेसबुक लाइव्ह करत मारहाण केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या पाच जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय कुऱ्हाडे अस शिक्षकाचे नाव असून त्यांनी आमदार राम कदम यांच्या वक्तव्यावरून प्रीतम मुंडेंबद्दल आक्षेपार्ह मजकूर फेसबुकवर पोस्ट केला होता. त्यामुळे संतापलेल्या मुंडे समर्थकांनी कुऱ्हाडे यांना मारहाण केल्याचे सांगण्यात येते. गणेश कऱ्हाड (रा. मूळ बीड, सध्या हडपसर, पुणे) असे मारहाण केलेल्या संशयिताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय कुऱ्हाडे या शिक्षकाने आमदार राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून प्रीतम मुंडे या देखील अविवाहित आहेत, असा मजकूर फेसबुकवर पोस्ट केला होता. संजय कुऱ्हाडे हे एका शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी दुपारी निगडी येथील निवेदिता बँकेसमोर मुंडे सर्मथकांनी शिक्षक संजय कुऱ्हाडे यांना बोलवून घेतले आणि फेसबुक लाइव्ह करत माफी मागायला लावली. त्यानंतर शिवीगाळ करत मारहाण केली. याप्रकरणी निगडी पोलिसात संशयित गणेश कऱ्हाड यांच्यासह पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First Published on September 9, 2018 8:03 pm

Web Title: pritam munde supporters beaten teacher on facebook live video