News Flash

निश्चलनीकरणामागे परकीय कंपन्यांचे हितसंबंध

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

पृथ्वीराज चव्हाण (संग्रहित छायाचित्र)

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

देशातील काळा पैसा बाहेर काढणे, भ्रष्टाचार कमी करणे आणि दहशतवादी कारवायांची रसद तोडणे, ही निश्चलनीकरण करण्याचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी सांगितलेली तीनही उद्दिष्टे असफल ठरली आहेत. उलट रोकडरहित अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करण्याच्या उद्देशातून घेण्यात आलेल्या निश्चलनीकरणाच्या निर्णयामागे परकीय कंपन्यांचे हितसंबंध गुंतलले आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी केला. या निर्णयामुळे रिझव्‍‌र्ह बँकेची स्वायत्तता मातीत गेली असून देशाची अर्थव्यवस्था आपण कोणाच्या हाती गहाण टाकत आहोत, असा सवालही चव्हाण यांनी केला.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या १४३ व्या ज्ञानसत्राचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या प्रसंगी ‘निश्चलनीकरण’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक अध्यक्षस्थानी होते.

निश्चलनीकरणाचा निर्णय अविचारीपणे घेतला गेला. उलट काळा पैसा बँकेत जमा केला गेल्याने अनायासे पांढरा झाला, याकडे लक्ष वेधून चव्हाण म्हणाले,की ५० दिवस देशातील जनतेने त्रास सहन केला. त्याविरुद्ध बोलणाऱ्याला तर भ्रष्टाचाराचा पुरस्कर्ता आणि देशद्रोही ठरविले गेले. नोटाबंदीच्या निर्णयाविरोधात सर्व राजकीय पक्ष एकत्र आले असते तर, सरकारला या निर्णयाचा फेरविचार करावा लागला असता. हे आमचे अपयश ठरले. रघुराम राजन यांनी विरोध केल्यामुळे त्यांना हटवून ऊर्जित पटेल यांना आणले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2017 1:13 am

Web Title: prithviraj chavan on bjp currency demonetisation
Next Stories
1 कुलगुरू पदासाठीच्या पहिल्याच फेरीत विद्यापीठातील अनेकांचे अर्ज अपात्र
2 ‘नीट’च्या प्रवेशपत्रांना पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणींचा फटका
3 बाणेर दुर्घटनाप्रकरणी बचाव पक्षाला लेखी म्हणणे सादर करण्याचे आदेश
Just Now!
X