01 October 2020

News Flash

पिंपरीतील करोना काळजी केंद्रांचे खासगीकरण

सुमारे २० कोटी खर्चाचा प्रस्ताव

सुमारे २० कोटी खर्चाचा प्रस्ताव

पिंपरी : वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे पालिकेच्या यंत्रणेवर असलेला ताण आणि अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत पिंपरी पालिकेने शहरातील १८ करोना काळजी केंद्रांचे (करोना केअर सेंटर) खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. खासगी रुग्णालये तसेच खासगी संस्थांना ही केंद्र तीन महिन्यांसाठी चालवण्यासाठी देण्यात येणार असून त्यासाठी पालिकेकडून सुमारे २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. सद्य:स्थितीत ६५ हजाराच्या घरात करोनाबाधित रुग्ण आहेत. दररोज सरासरी हजार ते बाराशे नवे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडू लागला आहे.

त्यामुळे पालिकेने सुरू केलेली करोना काळजी केंद्र आता खासगी पद्धतीने चालवण्यासाठी देण्याचा निर्णय आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे. बुधवारी (१६ सप्टेंबर) स्थायी समितीपुढे  यासाठी येणाऱ्या सुमारे २० कोटी रुपये खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे.

प्रस्तावात नमूद केल्यानुसार, बालेवाडी क्रीडासंकुल (बालेवाडी), म्हाडा वसाहतीच्या चार इमारती (म्हाळुंगे), डॉ. डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह (रावेत), मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह व  सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह (मोशी), घरकुल प्रकल्पातील सहा इमारती (चिखली), बालाजी विधी महाविद्यालय (ताथवडे), पीसीसीओपी महाविद्यालय वसतिगृह (आकुर्डी-प्राधिकरण) आदी ठिकाणी महापालिकेच्या वतीने करोना काळजी केंद्र सुरू करण्यात आले आहे. यापुढे तीन महिन्यांच्या कालावधीसाठी खासगी पद्धतीने ही केंद्र चालवण्यासाठी देण्यात येणार आहेत.

देण्यात येणारी रक्कम

खासगी रुग्णालये, त्यांच्याकडील खाटांची संख्या आणि त्यांना पालिकेकडून देण्यात येणारी खर्चाची रक्कम पुढीलप्रमाणे आहे. बीव्हीजी ग्रूप (५०० खाटा, २ कोटी ३२ लाख), ट्रस्ट हेल्थ केअर (४०० खाटा, २ कोटी २३ लाख), मे. आयकॉन हॉस्पिटल (८०० खाटा, ३ कोटी ९० लाख), मे. डीवाईन हॉस्पिटल (४०० खाटा, एक कोटी ९५ लाख), डॉ. भिसे हॉस्पिटल (८०० खाटा, ३ कोटी ६७ लाख), रूबी अलकेअर (६०० खाटा, २ कोटी ७० लाख), आयुश्री हॉस्पिटल (१०० खाटा, एक कोटी ३४ लाख), एक्स. एस. टी. प्रा. लि. (१०० खाटा, एक कोटी ३४ लाख रुपये).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:39 am

Web Title: privatization of covid care centers in pimpri zws 70
Next Stories
1 पुण्यात घरभाडय़ामध्ये २५ ते ३० टक्क्यांची घट
2 दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा परिस्थितीनुसार
3 औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाला दुप्पट अर्ज
Just Now!
X