चिखलीतील ब्रह्मा विष्णू महेश संघाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंच्या बक्षिसासाठी २५ लाखांच्या विविध दुचाकी व मोटारी ठेवण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष स्पर्धेस सुरुवात करण्यापूर्वी या सर्व दुचाकी व मोटारी कंटेनरवर ठेवून ढोलताशे आणि डीजेच्या दणदणाटात त्याची गावभर मिरवणूक काढण्यात आली.
राज्यभरातील नामांकित ४८ संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी खासदार उदयनराजे भोसले येणार होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना आमंत्रण दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. तथापि, ते आलेच नाहीत. खासदार शिवाजीराव आढळराव व राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष आझम

खासदार शिवाजीराव आढळराव आणि आझम पानसरे यांच्या हस्ते चिखलीतील कबड्डी स्पर्धाचे उद्घाटन झाले.

पानसरे यांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी आमदार दिलीप मोहिते, संयोजक नगरसेवक दत्ता साने, महेश लांडगे, संजय नेवाळे, उपमहापौर राजू मिसाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश चांदगुडे, शांताराम जाधव, सुनील जाधव, विजय म्हात्रे, राजू घुले आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते.
उद्घाटनाच्या पहिल्या सामन्यात महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने मुंबईच्या अमर हिंदू मंडळावर १४ गुणांनी विजय मिळवला. राजमाता संघाच्या स्नेहल शिंदे या राष्ट्रीय खेळाडूने पहिल्या हाफमध्ये उत्कृष्ट चढाई करून ७ गुणांची आघाडी घेतली. पुरूष गटातील सामन्यात रायगडच्या सोनार सिध्द संघाने मुंबईच्या अमर हिंदू मंडळावर १२ गुणांनी मात केली. नंदूरबारच्या एनटीपी संघाने पुण्याच्या राणाप्रताप संघावर ४ गुणांनी विजय मिळवला. स्पर्धेचे निरीक्षक म्हणून सुनील जाधव, दत्ता झिंजुर्डे यांनी काम पाहिले.