03 December 2020

News Flash

मालमत्ता खरेदी-विक्री नोंदणी ठाण्यात रविवारीही

दसऱ्यानिमित्त दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

(संग्रहित छायाचित्र)

दसऱ्याच्या मुहूर्तावर जमीन, घर आणि सदनिका खरेदीला नागरिकांकडून प्राधान्य दिले जाते. हा मुहूर्त साधण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे, ठाणे आणि नाशिकमधील निवडक दुय्यम निबंधक कार्यालये रविवारी सुरू ठेवण्याचा निर्णय राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून घेण्यात आला आहे.

राज्यभरात ५०७ दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्यामुळे जमीन, घर आणि सदनिका खरेदी-विक्रीसाठी मुहूर्त म्हणून दसऱ्याला पसंती दिली जाते. त्यामुळे काही निवडक दुय्यम निबंधक कार्यालये सुट्टी असूनही सुरू ठेवण्याबाबत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. राज्यातील सर्व दुय्यम निबंधकांशी चर्चा करून पुणे, ठाणे आणि नाशिक शहरांमधील निवडक कार्यालये रविवारी (२५ ऑक्टोबर) सुरू राहतील, अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.

दसऱ्याला सुरू राहणारी कार्यालये

पुणे शहरातील दापोडी सहदुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक १७ आणि २५, एरंडवणा येथील क्र. २१ आणि २२, तर लष्कर परिसरातील (कॅ म्प) क्र. २३ या कार्यालयांचा यात समावेश आहे. नाशिकमधील सहदुय्यम निबंधक वर्ग दोनकडील नाशिक क्र. तीन, तर ठाण्यामधील सहदुय्यम निबंधक वर्ग-दोन, कल्याण क्र. तीन, ठाणे ग्रामीणमध्ये सहदुय्यम निबंधक वर्ग-दोन, भिवंडी क्र. एक, दोन आणि तीन, उल्हासनगर क्र. चार, रायगड-अलिबागमधील सहदुय्यम निबंधक वर्ग-दोन, पनवेल क्र. तीन ही कार्यालये सुरू राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 24, 2020 12:25 am

Web Title: property purchase and sale registration in pune nashik also on sunday abn 97
Next Stories
1 पुण्यात ३२१ नवे करोना रुग्ण, पिंपरीत पाच मृत्यू
2 पुण्याच्या गोल्डमॅनवर पत्नीला मारहाण करुन गर्भपात केल्याचा आरोप, गुन्हा दाखल
3 “…म्हणून आत्महत्या करतोय,” पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषणकरांची सुसाईड नोट सापडल्याने खळबळ
Just Now!
X