07 August 2020

News Flash

करोनाच्या संकटात परदेशी तरुणीचा व्हाट्सअ‍ॅपद्वारे देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश

दोन जणी पोलिसांच्या ताब्यात

सध्या सर्वत्रच करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात करोना विषाणूचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असताना शहरात परदेशी महिला आणि तरुणी व्हाट्सऍपद्वारे देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याची बाब समोर आली आहे. वाकड पोलिसांनी हा सर्व प्रकार उजेडात आणला असून संबंधितांना ताब्यातही घेण्यात आलं आहे.

या प्रकरणी २५ वर्षीय तरुणी आणि ४० वर्षीय महिलेविरोधात वाकड पोलीस ठाण्यात अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय परदेशी नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतात राहण्यासाठी लागणाऱ्या व्हिजाची मुदत संपली असता बेकायदेशीररित्या राहात असल्याचेदेखील पोलीस तपास समोर आले आहे. या घटनेप्रकरणी वाकड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अधिकारी सपना देवतळे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ युगांडा येथे राहणारी २५ वर्षीय तरुणी आणि ४० महिला या पिंपरी-चिंचवड शहरात करोनाच्या महामारीच्या संकटात देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याचे समोर आले आहे. त्यांनी एक व्हॉटसअ‍ॅप नंबर प्रचलित केला होता. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात राहत असलेल्या भाड्याच्या घरात ग्राहक बोलावून देहविक्रीचा व्यापार करत. दरम्यान, त्यांच्या या कृत्यामुळे करोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत होती. दरम्यान, या घटनेची माहिती वाकड पोलिसांना मिळताच तातडीने संबंधित ठिकाणी जाऊन महिला आणि तरुणीला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, उपजीविका भागविण्यासाठी त्या देहविक्री करत असल्याचं त्यांनी म्हटले आहे. या व्यतिरिक्त आणखी मोठे परदेशी रॅकेट आहे का ? याचा तपास वाकड पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 18, 2020 10:17 am

Web Title: prostitution business of a foreign girl in whatsapp coronavirus crisis pune pimpari chinchwad kjp 91 jud 87
Next Stories
1 संगीतात नवे प्रयोग महत्त्वाचे!
2 अराजपत्रित पदांची भरती प्रक्रिया राबवण्यास एमपीएससी तयार
3 खासगी रुग्णालयांतील रुग्णांना घरी पाठवा!
Just Now!
X