News Flash

देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांचा अभिमान वाटतो – सुभाष भामरे

भामरे म्हणाले, विद्यार्थिदशेत असल्यापासून मला सैन्यदलाचे विशेष आकर्षण होते.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या द्विशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे उपस्थित होते.

प्रतिकूल वातावरण, दुर्गम भागात प्राणांची पर्वा न करणाऱ्या जवानांचा मला अभिमान वाटतो, अशा शब्दांत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी शनिवारी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा गौरव केला.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या द्विशताब्दी वर्षांनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, समाज कल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष राजीव सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. यादव या प्रसंगी उपस्थित होते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या द्विशताब्दी वर्षांनिमित्त ‘द बॅलार्ड ऑफ टु हंड्रेड इयर्स’ या स्मरणिकेचे प्रकाशन भामरे यांच्या हस्ते करण्यात आले.

भामरे म्हणाले, विद्यार्थिदशेत असल्यापासून मला सैन्यदलाचे विशेष आकर्षण होते. आज मी संरक्षण राज्यमंत्री म्हणून ईशान्येकडील राज्य तसेच जम्मू काश्मीरमधील भागांना भेट देत असतो. अतिदुर्गम भाग तसेच प्रतिकूल हवामानात जवान प्राणांची पर्वा न करता सीमेचे संरक्षण करतात. त्यांचा मला अभिमान वाटतो. पंतप्रधानांच्या कल्पनेतून साकारलेल्या ‘स्वच्छ भारत अभियान’ योजनेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचा समावेश आहे. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील अकरा कॅन्टोन्मेंट बोर्डानी सहभाग नोंदविला आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड देशात आदर्श ठरले आहे.

बोर्डाचे अध्यक्ष राजीव सेठी यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आभारप्रदर्शन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2017 2:13 am

Web Title: proud feel country defense soldiers says subhash bhamre
Next Stories
1 गोरक्षेच्या नावाखाली धांगडधिंगा!
2 शिक्षणाची ‘पाऊलवाट’ रूंद करण्याबरोबरच ग्रामविकासाचा ध्यास
3 मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर कारची टँकरला धडक, तीन ठार
Just Now!
X