News Flash

‘संभ्रमामुळे रुग्ण होमिओपॅथीपासून वंचित’

अमेय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आणि गोर्ले यांनी लिहिलेल्या ‘होय होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते’ या पुस्तकाचे रविवारी प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

| July 7, 2014 03:05 am

‘होमिओपॅथी म्हणजे एक प्रकारची अंधश्रद्धाच आहे, होमिओपॅथीच्या गोळ्यांमध्ये औषधच नसते, अशा व्यक्त केल्या जाणाऱ्या मतांमुळे संभ्रमात पडलेला रुग्ण या पॅथीच्या लाभापासून वंचित राहतो. परंतु होमिओपॅथीविषयीचे बरेचसे समज हे गैरसमज आहेत,’ असे मत लेखक शिवराज गोर्ले यांनी व्यक्त केले.
अमेय प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आणि गोर्ले यांनी लिहिलेल्या ‘होय होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते’ या पुस्तकाचे रविवारी प्रसिद्ध अभिनेते नितीश भारद्वाज यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ. शैलेश देशपांडे यांच्या ‘सर्च होमिओपॅथिक कन्सल्टिंग अँड कॅन्सर केअर सेंटर’च्या संशोधनावर हे पुस्तक आधारित आहे. डॉ. देशपांडे, डॉ. रजनी इंदुलकर, प्रकाशक उल्हास लाटकर या वेळी उपस्थित होते.
गोर्ले म्हणाले, ‘‘होमिओपॅथीविषयी समाजात गैरसमज आहेत. या औषधांचा लवकर गुण येत नाही, औषध घेताना पथ्ये पाळावी लागतात असेही सांगितले जाते. ते खरे नसून संभ्रमामुळेच अनेक रुग्ण या पॅथीचा लाभ घेत नाहीत. होमिओपॅथी कर्करोगावरही प्रभावी ठरत असल्याचे सर्च या संस्थेच्या संशोधनात स्पष्ट होते. तसेच होमिओपॅथीच्या वापरामुळे शस्त्रक्रियाही टाळता येणे शक्य झाल्याचा माझा वैयक्तिक अनुभव आहे.’’
होमिओपॅथीवर टीका करणारे दबाव गटच वैद्यकीय क्षेत्रात तयार झाल्याचे भारद्वाज यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आयुर्वेद व होमिओपॅथी या मूळच्या नैसर्गिक पॅथी असूनही त्यांना काही जण ‘अल्टरनेटिव्ह पॅथी’ म्हणतात. खरे तर नैसर्गिक निर्मिती नसलेल्या आणि रासायनिक औषधांचा मारा करणाऱ्या अॅलोपॅथीलाच ‘अल्टरनेटिव्ह’ म्हणायला हवे. ज्यांचा या पॅथीवर विश्वास आहे त्यांनी त्याविषयी इतरांना सांगणे आवश्यक आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 3:05 am

Web Title: publication of book on homeopathy written by shivraj gorle
Next Stories
1 प्रवासी म्हणून मोटारीत बसवून लूटमार करणाऱ्या दोघांना अटक –
2 ‘सर्वसामान्यांना उभारी देण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले’ – श्रद्धांजली सभेत मान्यवरांच्या भावना
3 चाकण एमआयडीसीतील प्लॅस्टिक कंपनी आगीत खाक –
Just Now!
X