यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि अमेय प्रकाशनाच्या वतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी लिहिलेल्या ‘दुसरी हरितक्रांती’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानचे सचिव अंकुश काकडे आणि अमेय प्रकाशनाचे उल्हास लाटकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  
२ ऑगस्टला (शनिवारी) दुपारी ४ वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होणार आहे. पवार या वेळी उपस्थित राहणार आहेत. २००४ मध्ये देशापुढे अन्नधान्य टंचाईचे संकट उभे राहिल्यानंतर पवार यांचा कृषीखात्यात झालेला प्रवेश आणि कृषीक्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी केलेले प्रयोग, या प्रवासाचे त्यांच्याच भाषणांमधून समोर आलेले चित्र या पुस्तकात आहे, असे या वेळी सांगण्यात आले.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
political fight, murlidhar Mohol, ravindra Dhangekar, pune Metro credit
मेट्रोच्या श्रेयवादावरून मोहोळ- धंगेकर यांच्यात खडाजंगी
Prakash Awade, dhairyasheel mane,
कोल्हापूर : प्रकाश आवाडे यांचे बंड थंड; मुख्यमंत्र्यांच्या मनधरणीनंतर धैर्यशील मानेंच्या प्रचारात सक्रिय