News Flash

धक्कादायक : पुण्यात एकाच दिवसात आढळले १८८२ रुग्ण , तर १७ रुग्णांचा मृत्यू

पुणे शहरातील रुग्णांची संख्या ३१ हजार ८८४ वर

धक्कादायक : पुण्यात एकाच दिवसात आढळले १८८२ रुग्ण , तर १७ रुग्णांचा मृत्यू
संग्रहित छायाचित्र

पुणे शहरात आज दिवसभरात १८८२ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर शहरात आज करोनामुळे १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुणे शहरातील रुग्णांची संख्या आता ३१ हजार ८८४ एवढी झाली आहे. पुण्यात आज अखेरपर्यंत ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान मागील २४ तासात करोनावर उपचार घेणार्‍या ७६४ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, पुणे शहरात ९०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर त्यामुळे २० हजार ३३४ रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

राज्यात रुग्णवाढीचा वेग कायम असून, ८ हजार ६४१ नव्या रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात २६६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 11:08 pm

Web Title: pune 1882 patients were found in a single day while 17 patients died abn 97 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात ५४७ नवे करोना रुग्ण
2 दिव्यांग चिन्मयला करायचंय बँकीग क्षेत्रात करिअर, बारावीला मिळवले 74 टक्के गुण
3 हॉटेलमध्ये काम करून बारावीला मिळवले 77 टक्के गुण, आता सीए व्हायचे स्वप्न
Just Now!
X