News Flash

पुणे : ७० वर्षीय नराधमाकडून १० वर्षीय मुलीवर लैगिंक अत्याचार

आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

पुण्यातील कोंढवा परिसरात एका दहा वर्षीय मुलीवर ७० वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दिलीप आडागळे, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील दोघेही बाहेर कामावर जातात. ते दोघे कामावर गेल्यावर, आरोपी दिलीप हा त्या मुलीवर अत्याचार करायचा. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वी देखील घडल्यानंतर अखेर मुलीने आई-वडील घरी आल्यावर त्यांना याबाबत सांगितले. त्यानंतर मुलीच्या आई-वडिलांनी तत्काळ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास करण्यात येत असल्याचे कोंढवा पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 7:09 pm

Web Title: pune a 70 year old man sexually abused a 10 year old girl msr 87 svk 88
Next Stories
1 Pune MIDC Fire : कंपनीचा मालक निकुंज शाहाला १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
2  ‘स्वच्छ’संस्थेला काम देण्याचा खेळ
3 निधीमुळे गती
Just Now!
X