News Flash

पुणे : दारू पिणार्‍या व्यक्तीचे फोटो काढणार्‍या पत्रकारास टोळक्याकडून मारहाण

खासगी रूग्णालयात उपचार सुरू; बिबवेवाडी भागातील घटना

प्रतिकात्मक छायाचित्र

राज्यात मागील दोन दिवसांपासून मद्य विक्रीला सुरुवात झाल्याने, दारूच्या दुकाना बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. या दारू विक्रीचे अनेक माध्यमांनी वार्तांकन देखील केले आहे.  याच दरम्यान पुण्यातील बिबवेवाडी भागातील एक पत्रकार दारू पिणार्‍या व्यक्तीचे फोटो काढत होते. त्यावेळी चार जणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केल्याची घटना घडली.  भूषण गरुड असे या मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकारांचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी भागात पत्रकार भूषण गरुड हे दारू पिणार्‍या व्यक्तीचे काल(मंगळवार) रात्री 8 वाजेच्या सुमारास फोटो काढत होते. त्यावेळी चार जणांच्या टोळक्याने त्याचा अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. या घटनेत भूषण गरुड हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार प्राप्त झाली असून आता जखमी भूषण गरुड यांचा जवाब नोंदविल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2020 1:15 pm

Web Title: pune a journalist who took a photo of a drunken man was beaten by a mob msr 87 svk 88
Next Stories
1 पुण्यातील प्रसिद्ध गोल्डमॅन सम्राट मोझे यांचे निधन
2 सुशोभीकरणाचा घाट
3 मद्यप्रेमासाठी उन्हाचा चटकाही सौम्य!
Just Now!
X