पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गाडेवाडी येथील दगडी खाणीमध्ये मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खाणीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा तपास पौड पोलिस करीत आहे. लहू मधू वाघमारे (वय- ३२ वर्षे, रा. गाडेवाडी उरावडे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडेवाडी येथील दगडी खाणीमध्ये लहू वाघमारे आणि त्याचा चुलत भाऊ मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी अचानक वरच्या कठड्यावरून लहू पाण्यात पडला. तेथून दूरवर बसलेल्या चुलत भावाला हे दिसले. त्यावर त्याने देखील लहूला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र तोवर तो पाण्यात बुडला होता. त्याने खूप शोध घेण्याचा प्रयत्न केला,. मात्र तो काही सापडला नाही.

या घटनेची माहिती पोलीस काही वेळात घटनास्थळी पोहोचले. ती खाण जवळपास ७० फुट खोली होती. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्याच्या मदतीने लहूला शोधण्याचा प्रयत्न केला गेला. तब्बल १२ तासानंतर त्याचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. या घटनेबाबत त्याच्या चुलत भावाकडे अधिक चौकशी केली असता. तो खाली कसा काय पडला. त्याला चक्कर आली असावी किंवा त्याला फिटचा त्रास असल्याने, खाली पडला असावा अशी शक्यता त्याने व्यक्त केली.