केंद्रीय विद्युत यंत्रणेतील वाहिनीची दुरुस्ती व अदानी वीज प्रकल्पातील संच तांत्रिक कारणांनी बंद पडल्याने राज्यात १६०० मेगाव्ॉट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यामुळे गुरुवारी पुण्यालाही वीजकपातीचा फटका बसला. पुणे व िपपरी- चिंचवड शहरामध्ये फिडरनिहाय सुमारे पावणेदोन तासांची वीजकपात करण्यात आली.
केंद्रीय वीज यंत्रणेतील सिपत-बिलासपूर वाहिनीच्या दुरुस्तीमुळे तेथून सुमारे ३५० ते ५०० मेगाव्ॉट वीज मिळणे कमी झाले आहे. अदानी वीज प्रकल्पातील ६६० मेगाव्ॉट क्षमतेचे दोन संच अचानक बंद पडले. त्याचा परिणाम म्हणून राज्यात विजेची तूट निर्माण झाली. त्यामुळे राज्याच्या विविध भागात वीजकपात करावी लागत आहे.
पुणे शहराचा समावेश महावितरणच्या ‘ए-वन’ गटात करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील वीजकपात पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. मात्र, मोठी तूट निर्माण झाल्याने पुण्यातही वीजकपात करावी लागली. वेगवेगळ्या भागामध्ये फिडरनिहार ही वीजकपात करण्यात आली. गुरुवार हा दुरुस्ती व देखभालीचा दिवस असल्याने दुरुस्तीसाठी वीज बंद असावी, असे अनेकांना वाटले. मात्र, ही वीजकपात असल्याचे ‘महावितरण’कडून स्पष्ट करण्यात आले आहे. बंद पडलेल्या वीज निर्मिती संचाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, शुक्रवापर्यंत वीजस्थिती पूर्ववत होईल, असे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे.