‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ म्हणजेच इसिस या दहशतवादी संघटनेकडून पुण्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख भानुप्रताप बर्गे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. १० जानेवारीला मुंबई पोलीस आयुक्तालयाला मिळालेल्या एका पत्रात यासंबंधीचा उल्लेख आहे. या पत्रात इसिसने भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या कुटुंबियांना संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. सध्या हे पत्र पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून विशेष शाखेकडून या पत्राची तपासणी सुरू आहे आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पुण्याच्या शिवाजी नगर भागात असणाऱ्या एटीएस कार्यालयाबाहेरील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. तरूणांना इसिसमध्ये सामील होण्यापासून रोखण्यासाठी सध्या एटीएसकडून पुण्यात विविध ठिकाणी समुपदेशनाचे कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर इसिसकडून धमकीचे पत्र पाठविण्यात आल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 13, 2016 9:50 am