पुण्यातील गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी त्याच्यासह नऊ जणांना अटक केली. त्यानंतर आज(बुधवार) पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता. प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
पुणे: सुटका, मिरवणूक अन् पुन्हा अटक… सुटकेनंतर २४ तासांमध्ये गुंड गजानन मारणे पोलिसांच्या ताब्यात
गजानन मारणे हा तळोजा कारागृहापासून ३०० पेक्षा अधिक चारचाकी गाड्यांच्या ताफ्यासह पुण्यात दाखल झाला होता. या जंगी मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने या घटनेची एकच चर्चा सुरू झाली. अखेर या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गजानन मारणेसह नऊ जणांविरोधात काल(मंगळवार) गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या सर्वांना अटक करण्यात आली.
पुणे: कुख्यात गुंड गजानन मारणेसह साथीदारांवर गुन्हा दाखल; दहशत पसरविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
गजानन पंढरीनाथ मारणे, प्रदीप दत्तात्रय कंधारे, बापू श्रीमंत बागल, अनंता ज्ञानोबा कदम, गणेश नामदेव हुंडारे, रुपेश कृष्णराव मारणे, सुनील नामदेव बनसोडे, श्रीकांत संभाजी पवार आणि सचिन ताकवले यांना अटक करण्यात आली होती. तर मारणेसह त्याच्या २०० त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये मंगळवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी मारणेसह नऊ जणाना पोलिसांनी अटक केली व इतर गुन्हा दाखल झालेल्यांपैकी २७ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.
धक्कादायक! कुख्यात गुंडाची तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणूक; सोबत ३०० चारचाकी गाड्यांचा ताफा
दरम्यान आज(बुधवार) त्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील आर. के. बाफना भळगट यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील संजय दीक्षित आणि बचाव पक्षाच्यावतीने विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यावर न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यावर बचाव पक्षांने जामीन मिळावा अशी बाजू मांडली. त्यानंतर अखेर त्या सर्वांना प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 17, 2021 10:09 pm