सोमवारी रात्री बावधान बुद्रुकमधील बिग बास्केट या ऑनलाइन किराणामाल आणि भाज्या विक्री करणाऱ्या गोडाऊनला आग लागली. रात्री साडेअकरा वाजता बावधान येथील गोडाऊनला ही आग लागली. रात्रीच्यावेळी आग लागल्याने गोडाऊनमध्ये फार लोक नव्हती. या आगीमधे धान्य, भाजीपाला, किराणा सामान जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका अग्निशमन दल, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए आणि एमआयडीसी येथील एकूण १२ फायर इंजिन्सच्या मदतीने आग विझवण्यात आली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामनदलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली आहे.

रात्रीच्या वेळी आग लागल्याने या ठिकाणी फार लोक नसल्याने सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या आगीमध्ये लाखो रुपयांचा माल आणि गोडाऊन जळून खाक झालं आहे.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Mephedrone Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन, आरोपीला अटक
Maharashtra State Electricity Board, Contract Workers, Strike, Supported, Permanent Employees organization
राज्यात वीज चिंता! कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात ७ कायम संघटनांची उडी
Single airline monopoly Nagpur
नागपूर-मुंबईदरम्यान एकाच विमान कंपनीची मक्तेदारी; प्रवासी त्रस्त, कंपनी…