14 August 2020

News Flash

पुण्यातील भाजप आमदार मुक्ता टिळक यांना करोनाची लागण

आईचाही करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

पुण्यातील भाजपाच्या आमदार मुक्ता टिळक यांना करोना व्हायरसची लागण झाली आहे. मुक्ता टिळक आणि त्यांच्या आईचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. स्वत: मुक्ता टिळक यांनी टि्वट करुन त्यांचा करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली.

आमच्या दोघींमध्ये करोनाची कुठलीही लक्षणे दिसत नव्हती असे मुक्ता टिळक यांनी सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या सेल्फ आयसोलेशनमध्ये असून घरीच होम क्वारंटाइनमध्ये आहेत. कुटुंबीयातील अन्य सदस्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याची त्यांनी माहिती दिली. मुक्ता टिळक पुण्याच्या माजी महापौर आहेत. मागच्यावर्षी त्या कसबा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या.

मुंबई, पुणे या दोन शहरात करोनाचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव झाला आहे. इथे करोना रुगणांची संख्या सातत्याने वाढत आहे. एकूणच संपूर्ण देशात करोना रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींना करोनापासून सर्वाधिक धोका आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 6:20 pm

Web Title: pune bjp mla mukta tilak corona positive dmp 82
Next Stories
1 करोनावर लस येण्यासाठी किमान सहा महिने लागणार-अदर पूनावाला
2 या पुढच्या काळात लॉकडाउन झेपणार नाही : चंद्रकांत पाटील
3 कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी राजकारणात येण्याचा निर्णय : प्रिया बेर्डे
Just Now!
X