News Flash

पुणे : “रमजान ईद घरीच साजरी करा”; मनपा आयुक्तांचे आवाहन!

'ब्रेक द चेन' आदेशाचे काटेकोर पालन करावे असे देखील सांगितले आहे.

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरातील करोनाबाधितांची संख्या अद्यापही वेगाने वाढत आहे. आगामी काळात ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर आज पुण्याचे महागरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिका क्षेत्रात रमजान ईदच्या निमित्त काही मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

रमजान ईद (इद उल फित्र) १३ किंवा १४ मे रोजी (चंद्रदर्शनावर अवलंबून) साजरी केली जाणार आहे. सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली अतिसंसर्गजन्य परिस्थिती व वाढत्या कोरना रूग्ण संख्येचा विचार करता. महाराष्ट्र शासनाच्या १३ एप्रिल २०२१ व १७ एप्रिल २०२१ रोजीच्या निर्गमित केलेल्या आदेशातील तरतुदीच्या अधीन राहून विशेष खबरदारी घेत रमजान ईद साजरी करणे आवश्यक आहे. असे आयुक्त विक्रम कुमार म्हणाले आहेत.

तसेच, करोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी पवित्र रमजान ईद करता मुस्लीम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आप आपल्या घरातच साजरे करून ब्रेक द चेन आदेशाचे काटेकोर पालन करणे उचित ठरेल. असंही आयुक्तांनी सांगितले आहे.

रमजानमधील खाद्यजत्रा यंदाही ओस

याचबरोबर दुकांनासाठी वेळेचे बंधन घालून दिले असून, त्याचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्यावेळे व्यतिरिक्त बाजारत सामान खरेदीसाठी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. रमजाना ईद निमित्त कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. धार्मिकस्थळं बंद असल्याने मुस्लिम समाजातील धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांनी पवित्र ईद साधेपणाने साजरी करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे देखील आवाहन महापालिका आयुक्तांकडून करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 9:57 pm

Web Title: pune celebrate ramadan eid at home appeal of municipal commissioner msr 87 svk 88
Next Stories
1 पुण्यातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा सर्रासपणे गैरवापर! ६३९ कोविड रुग्णालयांच्या ऑडिटचे निष्कर्ष!
2 थरारक! राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार; थोडक्यात बचावले
3 चक्रीवादळ टळले; पण पावसाची शक्यता
Just Now!
X