News Flash

पुण्यात दिवसभरात १०८ करोना बाधित रुग्ण, ८ जणांचा मृत्यू

शहरातील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ

संग्रहित छायाचित्र

संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यही करोना विषाणूचा सामना करत आहे. मुंबईसह पुणे शहरालाही या विषाणूचा चांगलाच फटका बसला आहे. दिवसेंदिवस करोना बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्यामुळे प्रशासनासमोरची चिंता काही केल्या कमी होत नाहीये. शनिवारी पुण्यात करोनाचे नवीन १०८ रुग्ण आढळले आहेत. यामुळे शहराची बाधित रुग्णसंख्या ६ हजार २०१ इतकी झालेली आहे.

आजच्या दिवसात ८ रुग्णांनी आपले प्राण गमावले असून आतापर्यंत पुणे शहरात करोनाशी लढताना मृत्यूमुखी पावलेल्या रुग्णांचा आकडा ३०९ इतका झाला आहे. दरम्यान, उपचार घेतलेल्या असलेल्या १९४ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. आज दिवसअखेर करोनामुक्त रुग्णांचा आकडा ३ हजार ६४४ इतका झालेला आहे.

शेजारी पिंपरी-चिंचवड शहरातही शनिवारी दिवसभरात १८ करोना बाधित रुग्ण आढळले असून यामध्ये ३ शहराबाहेरील करोना बाधितांचा समावेश आहे. शहरातील करोना बाधितांनी पाचशेचा आकडा ओलांडला असून एकूण संख्या ५११ वर पोहचली आहे. तसेच ३८ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २४९ जणांना घरी सोडण्यात आले असून सर्व जण ठणठणीत बरे झालेले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2020 8:17 pm

Web Title: pune city found new 108 covid 19 positive patients on saturday psd 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड : करोना बाधित रुग्णांची संख्या ५०० पार, दिवसभरात १८ नवीन रुग्ण
2 करोना संकटाशी सामना करीत वृद्ध आई करतेय अपंग असहाय्य मुलाचा सांभाळ
3 पिंपरी-चिंचवडमध्ये टोळी वर्चस्वातून एकाचा खून; आरोपी फरार
Just Now!
X