News Flash

पुण्यात जुलै अखेर 18 हजार करोनाबाधित असण्याची शक्यता : शेखर गायकवाड

पुणे महापालिकेत आजपर्यंत 112 अधिकारी आणि कर्मचारी करोनाबाधित

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे शहरात करोना विषाणूंचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. या रुग्णांमध्ये प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी देखील आहेत. आजअखेर 112 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून, त्या दरम्यान 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर या पैकी 61 जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या 41 जणांवर उपचार सुरू असल्याचे पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच, सध्याच्या रुग्ण संख्येच्या आकडेवारीवरून जुलै अखेर पर्यंत 18 हजार करोनाबाधित रुग्ण पुणे शहरात असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, पुणे शहरातील सध्याची रुग्ण संख्या 11 हजाराहून आधिक आहे. ही रुग्णांची संख्या लक्षात घेता, आता यापुढील काळात, ज्या रुग्णांना लक्षणे नाहीत. अशा रूग्णांना घरीच उपचार घ्यावेत, असा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याबाबतची अंमलबजावणी उद्यापासून होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयामुळे ज्या रुग्णांमध्ये लक्षणे दिसत आहेत. त्या सर्वांवर उपचार करणे, शक्य होणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच, मागील आठवड्यात शहरातील खासगी 16 रुग्णालये ताब्यात घेतले आहेत. आता पुढील आठवड्यात देखील आणखी काही रुग्णालये ताब्यात घेणार आहोत, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

पुणे शहरात काल दिवसभरात नव्याने 350 रुग्ण करोना पॉझिटिव्ह आढळल्याने, शहराची रुग्णसंख्या  11 हजार 465 वर पोहचली. शिवाय, सहा रुग्णांचा मृत्यू देखील झाला होता. त्यामुळे कालपर्यंत एकूण 493  रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. सामान्य नागरिकांबरोबरच करोना विरोधात सुरू असलेल्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या पोलिसांना देखील करोनाने विळखा दिला आहे. राज्यभरात मागील ४८ तासांत १४० पोलीस करोना पॉझिटिव्ह आढळले असून एका पोलिसाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 4:28 pm

Web Title: pune city likely to have 18000 corona patients by end of july shekhar gaikwad msr 87 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 टाळेबंदीत पावणेतीनशे रेखाचित्रांची निर्मिती करणारा हौशी अभियंता
2 मुलांची हत्या करून दाम्पत्याची आत्महत्या
3 राज्यसेवा मुख्य परीक्षेत प्रसाद चौघुले राज्यात प्रथम
Just Now!
X