28 September 2020

News Flash

२४ तासांत शहराला २५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा

चारही धरणांत १०.६६ अब्ज घनफूट पाणीसाठा

(संग्रहित छायाचित्र)

चारही धरणांत १०.६६ अब्ज घनफूट पाणीसाठा

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात मोठय़ा प्रतीक्षेनंतर दमदार पावसाला सोमवारी रात्रीपासून सुरुवात झाली. गेल्या २४ तासांत चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात शहराला २५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा झाला आहे. सध्या चारही धरणांत १०.६६ अब्ज घनफू ट (टीएमसी) एवढा पाणीसाठा झाला आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा के ला जातो. गेल्या २४ तासांत या चारही धरणांत ०.७५ टीएमसी एवढा पाणीसाठा वाढला आहे. सोमवारी रात्रीपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ६० मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात ४५ मि.मी., पानशेत धरण परिसरात ४१ मि.मी. आणि खडकवासला धरण क्षेत्रात २३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तर, मंगळवारी दिवसभरात सायंकाळपर्यंत टेमघर धरणांत ७० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरणात प्रत्येकी ६० मि.मी. आणि खडकवासला धरणात २१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सोमवापर्यंत चारही धरणांत ९.८२ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. हा पाणीसाठा मंगळवारी सायंकाळपर्यंत १०.६६ टीएमसी एवढा झाला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत या चार धरणांमध्ये कमी पाणीसाठा आहे.

गेल्या वर्षी ४ ऑगस्टपर्यंत या धरणांमध्ये २८.४८ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. परिणामी धरणे ९८ टक्के  भरली होती. यंदा आतापर्यंत धरणे के वळ ३७ टक्के  एवढीच भरली आहेत. त्यामुळे यापुढेही धरणांच्या परिसरात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे. याशिवाय पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात दिवसभरात ५९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून या धरणात २.७६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

धरणांमधील साठा टीएमसी कंसात टक्क्यांमध्ये

टेमघर ०.८२ (२२.०५), वरसगाव ४.५५ (३५.४७), पानशेत ४.५६ (४२.८७), खडकवासला ०.७३ (३७.१५), पवना २.७६ (३२.४३),

डिंभे ४.६५ (३७.२०), चासकमान १.३३ (१७.५४), भामा आसखेड ३.२५ (४२.४०), गुंजवणी २.०३ (५५.०८), निरा देवघर ३.०८ (२६.२२), भाटघर ९.७३ (४१.३८), वीर ३.७३ (३९.६६) आणि उजनी ६.८९ (१२.६८).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 1:16 am

Web Title: pune city received water for 25 days after rain in last 24 hours zws 70
Next Stories
1 व्यापारी संकुले, निवासी हॉटेल आजपासून सुरू
2 कोथिंबीर तेजीत;  जुडी २५ ते ३० रुपये
3 नोकरी, कार्यानुभवासाठी ऑनलाइन प्रक्रिया
Just Now!
X