पुणे : शहरात करोना संसर्गाचे निदान करणाऱ्या रॅपिड अँटिजेन चाचण्या सुरू  झाल्यानंतर दिवसागणिक नवीन रुग्णसंख्येत भर पडत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, मात्र त्याचवेळी के वळ पुणे शहरातील करोनामुक्त रुग्णसंख्येने २५ हजारांचा टप्पा पूर्ण के ला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बाब नागरिक आणि आरोग्य यंत्रणांसाठीही दिलासादायक ठरत आहे.

बुधवारी शहरातील बऱ्या झालेल्या रुग्णांच्या संख्येने २५ हजारांचा टप्पा पूर्ण केला. दररोज किमान पाचशेहून अधिक रुग्ण करोनामुक्त होऊन घरी जात आहेत. महापालिके च्या आरोग्य विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या दैनंदिन अहवालातून ही माहिती स्पष्ट होत आहे. संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात ससूनसारख्या सरकारी रुग्णालयात उपचार घेताना दगावलेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत होते, मात्र आता ससून तसेच पुणे महापालिके च्या नायडू रुग्णालयातून बरे होऊन घरी परतलेल्या रुग्णांची संख्याही मोठी असल्याचे दिसून येत आहे.

महापालिके चे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे म्हणाले,‘दहा दिवसांनंतर लक्षणे नसलेल्या करोना रुग्णांना घरी सोडण्याचे धोरण पुणे महापालिके तर्फे  अवलंबण्यात येत आहे. त्यामुळे बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या समाधानकारक आहे. शहरातील नव्या रुग्णांचे प्रमाण वाढत असले तरी लक्षणे वेळीच ओळखून योग्य वेळी निदान के ले असता रुग्ण पूर्ण बरा होतो, हे सातत्याने दिसून येत आहे. त्यामुळे ताप, सर्दी, खोकला यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने फॅ मिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.’