News Flash

पुणे : इंधन दरवाढीविरोधात महिला काँग्रेस आक्रमक, पंतप्रधान मोदींच्या फोटोला घातला चपलांचा हार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला चपलांचा हार आणि आरती करून निषेध

पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरात सतत होणाऱ्या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. आज(दि.३) पुण्यात महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अलका चौकामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त केला. यावेळी त्यांनी मोदींच्या फोटोची आरतीही केली. तसेच, आंदोलनाची दखल न घेतल्यास पुढच्यावेळी आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला.

“केंद्र सरकारमार्फत मागील महिन्याभरात गॅसच्या दारात सव्वाशे रुपये वाढ झाली आहे. तर दररोज पेट्रोल डिझेलमध्ये वाढ करून हा दर देखील 100 रुपयांपार गेलाय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालं आहे. त्यामुळे आम्ही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोस चपलांचा हार आणि आरती करून निषेध व्यक्त केला”, अशी माहिती यावेळी पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांनी दिली. तसेच, या आंदोलनाची दखल सरकारने घ्यावी अन्यथा भविष्यात आणखी तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 1:39 pm

Web Title: pune congress protests against rising prices of oil and lpg gas cylinders svk 88 sas 89
Next Stories
1 ‘पे अ‍ॅण्ड पार्क’बाबत चालढकल
2 बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी ‘नो पार्किंग’ची मात्रा
3 स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपकडून नितीन लांडगे
Just Now!
X