21 September 2020

News Flash

संसर्ग पूर्व भागातून पश्चिमेकडे

मार्च महिन्यात शहरात करोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला.

संग्रहित छायाचित्र

कोथरूड-बावधन, वारजे-कर्वेनगर आणि औंध-बाणेरमध्ये बाधितांच्या संख्येत वाढ

पुणे : शहराच्या पूर्व भागात मोठय़ा प्रमाणावर असलेला करोनाचा संसर्ग आता कोथरूड, कर्वेनगर, वारजे या पश्चिम भागाकडे सरकरण्यास सुरुवात झाली आहे. महापालिके ने जाहीर के लेल्या आकडेवारीवरून ही बाब पुढे आली आहे. कोथरूड-बावधन, वारजे-कर्वेनगर आणि औंध-बाणेर या तीन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत करोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे पुढे आले आहे. पश्चिम भागातील या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत २१ जुलैअखेपर्यंत करोनाबाधितांची संख्या ५ हजार ५५४  झाली आहे.

मार्च महिन्यात शहरात करोना संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आला. त्यानंतर शहरात करोनाचा संसर्गही वाढण्यास सुरुवात झाली. प्रारंभी पूर्व भागातील दाट लोकवस्ती, झोपडपट्ट्य़ांच्या भागात करोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर झाल्याचे पुढे आले होते. येरवडा, वडगांवशेरी, नगर रस्ता, भवानी पेठ, ढोले पाटील रस्ता या भागात जुलैपर्यंत सर्वाधिक रुग्ण होते. मात्र आता करोनाचा संसर्ग हा पूर्व भागातून पश्चिम भागाकडे सरकला असल्याचे महापालिके च्या आकडेवारीवरून पुढे आले आहे.

कोथरूड, कर्वेनगर, डहाणूकर कॉलनी, मयूर कॉलनी, एरंडवणा हॅप्पी कॉलनी, औंध, बाणेर बालेवाडी, पाषाण या भागात करोना संसर्ग सुरू झाल्यानंतरही रुग्ण आढळून आले नव्हते. महापालिके कडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीमध्येही हे भाग जून  अखेपर्यंत हिरव्या श्रेणीत राहिले होते. मात्र जूनअखेरपासून परिस्थितीमध्ये बदल होण्यास सुरुवात झाली असून पूर्व भागातील करोनाचा संसर्ग आता पश्चिम भागातही पसरण्यास सुरुवात झाल्याचे निदर्शनास आले आहे.

वारजे-कर्वेनगर, कोथरूड-बावधन आणि औंध-बाणेर या पश्चिम भागातील तीन क्षेत्रीय कार्यालयांमध्ये २१ जुलैअखेपर्यंत ५ हजार ५५४ रुग्णसंख्या आहे. तर पूर्व भागातील ढोले-पाटील रस्ता, येरवडा आणि भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ८ हजार २७७ रुग्ण आहेत. हिरव्या श्रेणीत असलेला पश्चिम भाग तीन आठवडय़ातच लाल श्रेणीत गेला आहे.

वारजे -कर्वेगनर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एरंडवणा- हॅपी कॉलनी या प्रभागात ७८८ रुग्ण आहेत. तसेच कर्वेनगर या प्रभागात ७१५ रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय वारजे-माळवाडी ४३३, शिवणे येथे १७७ तर शिवणे- उत्तमनगर परिसरात १२४ रुग्णांची नोंद महापालिके च्या आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे.  कोथरूड बावधन- बावधन क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत  कोथरूड डेपो परिसरात ४०९, रामबाग

कॉलनी-शिवतीर्थनगर या प्रभागात ९२६ रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. याशिवाय मयूर कॉलनी-डहाणूकर कॉलनी प्रभागात ६२० रुग्ण असून औंध-बोपोडी श्रेत्रीय कार्यालयाअंतर्गत औंध-बाणेर प्रभागात ९०५ तर बाणेर-बालेवाडी-पाषाण या प्रभागात ४५७ रुग्ण आढळून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2020 2:59 am

Web Title: pune corona virus eastern part of the city akp 94
Next Stories
1 शासकीय पदांची भरती एमपीएससीकडूनच होण्याची गरज
2 नदीपात्रातील दणदणाट थंडावला; ढोल पथकांचा सराव बंद
3 जुलैअखेर २७ हजार सक्रिय रुग्ण
Just Now!
X