पुणे : गेल्या चार आठवडय़ांचा विचार के ल्यास पुणे शहरात करोना चाचण्यांचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आले आहे. परिणामी पुण्यात रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य आणि मुंबईचा विचार के ल्यास सर्वात कमी मृत्युदर पुण्याचा आहे. सध्या शहराचा मृत्युदर २.५ टक्के  एवढा असून तो एक टक्क्यापेक्षा खाली आणण्याचे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाचे विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी गुरुवारी दिली.

गेल्या चार आठवडय़ांपासून म्हणजेच २५ जूनपासून आतापर्यंत शहरात करोना चाचण्यांचे प्रमाण देशभरातील चाचण्यांपेक्षा अधिक आहे. परिणामी शहरातील रुग्णांची संख्याही वाढली आहे. मात्र, मृत्युदर कमी ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे. २५ जून ते २१ जुलै या कालावधीत बाधितांची संख्या पुण्यात सर्वाधिक दिसत असली, तरी रुग्णांवर वेळीच उपचार होत असल्याने मृत्युदर घटला आहे.

देशातील मृत्युदर २.४१ टक्के , पुणे जिल्ह्य़ाचा मृत्युदर २.३५ टक्के  एवढा आहे. त्यामध्ये शहराचा २.५, पिंपरी चिंचवडचा २.५१, राज्याचा ३.७५ आणि मुंबईचा मृत्युदर ५.६१ टक्के  एवढा आहे. पुण्याचा मृत्युदर एक टक्क्यापेक्षाही खाली आणण्याचा प्रयत्न आहे, असे राव यांनी सांगितले.

पुणे महापालिके मुळे पुण्याची बदनामी

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्याची असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, वस्तुस्थिती तशी नाही. रुग्णसंख्येबाबत तयार के लेल्या डॅशबोर्डमध्ये उपचाराअंती बरे झालेल्यांची माहिती खासगी रुग्णालयांकडून अद्ययावत करण्यात येत नाही. त्यामुळे संबंधित रुग्ण अद्यापही सक्रिय असल्याचे समजून राज्य सरकारकडून आकडेवारी जाहीर करण्यात येते. ही जबाबदारी पुणे महापालिके ची असून महापालिके मुळे संपूर्ण जिल्ह्य़ाची बदनामी झाली, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी या वेळी सांगितले.