News Flash

पुण्यात लॉकडाउन? अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर विभागीय आयुक्तांची महत्वाची माहिती

महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश

संग्रहित छायाचित्र

राज्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून अनेक जिल्ह्यांमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात हॉटस्पॉट ठरणाऱ्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये पुण्याचाही समावेश आहे. त्यामुळे पुण्यातही नव्याने निर्बंध लागू केले जाणार का याबाबत चर्चा सुरु होती. पुण्यातील करोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार पुण्यात पोहोचले होते. अजित पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली आहे.

एकीकडे पुण्यात करोना रुग्णसंख्या वाढत असून चिंतेचं वातावरण असताना पुणेकरांना मात्र दिलासा मिळाला आहे. पुण्यात करोनासंदर्भात कोणतेही नवे निर्बंध लागू करण्यात आले नसल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

“पुण्यात शाळा, कॉलेज ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार आहेत. मात्र दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना सूट देण्यात आली आहे. तसंच रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणाऱ्यांना यामध्ये मुभा असणार आहे. हॉटेल, रेस्तराँ रात्री १० नंतर बंद असतील. दरम्यान त्यांना ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच रात्री १० नंतर एका तासासाठी हॉटेल, रेस्तरॉ यांना होम डिलिव्हरीची परवानगी आहे,” अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली.

आणखी वाचा- एमपीएससी प्रकरण हाताळण्यात कमी पडलं; अजित पवारांनी मांडलं स्पष्ट मत

पुढे ते म्हणाले की, “लग्न समारंभ, धार्मिक विधी, सार्वजनिक कार्यक्रम, अंत्यविधीप्रसंगी आणि दशक्रियाविधीसाठी फक्त ५० लोकांना परवानगी असणार आहे. नियमांचं उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. याशिवाय मॉल, हॉल्स, चित्रपटगृह रात्री १० नंतर बंद असतील. दरम्यान एमपीपएससी, युपीएससी परीक्षार्थींची गरज लक्षात घेता कोचिंग क्लाेस आणि ग्रंथालयं ५० टक्के क्षमेतने कार्यरत राहू शकतात”. गार्डन केवळ सकाळी सुरू राहतील तर संध्याकाळी बंद राहणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 12:44 pm

Web Title: pune coronavirus ajit pawar division commissioner saurab rao meeting sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 स्पर्धा परीक्षार्थींचा उद्रेक
2 शीर्षकात ‘साधू’; बजरंग दलाकडून नाट्यमहोत्सव रद्द
3 वीज थकबाकी भरण्यात शेतकरीच पुढे
Just Now!
X