News Flash

रुग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

त्या नागरिकाला तातडीने उपचाराची गरज होती.

प्रातिनिधिक फोटो

करोना विषाणूमुळे जगभरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. तर याच करोनामुळे पुण्यातील नाना पेठ भागातील 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे त्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत महापालिका आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले की, नाना पेठ भागातील घटनेची माहिती मिळाली असून संबधित कुटुंबीयांनी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला  फोन केला होता. त्या संदर्भात खुलासा मागविला असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे शहरात करोना विषाणूचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून शहरातील मध्य भागात अधिक प्रमाण आहे. यामुळे तो भाग सील करण्यात आला आहे. त्यामुळे करोनाचा फटका नाना पेठ भागात राहणार्‍या 65 वर्षीय जेष्ठ नागरिकाला बसला आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या छत्तीमध्ये दुखत होते. त्या नागरिकाला तातडीने उपचाराची गरज होती. त्यासाठी घरातील मंडळीनी रुग्णवाहिकेला देखील फोन केला. पण रुग्णवाहिका काही घटनास्थळी आली नाही.

यामुळे त्या नागरिकाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली असून त्या बाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये मयत जेष्ठ नागरिक एका खुर्चीवर, त्याच्या मागील बाजूस पत्नी आणि मुलगा दिसत आहे. हे सर्व रुग्णवाहिका येण्याच्या प्रतिक्षेत दिसत आहे.  त्या नागरिकाला वेळेत रुग्णवाहिका न मिळाल्याने जागेवरच प्राण सोडावे लागले. जवळपास तीन तासाने एक टेम्पो आला, मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अखेर तो मृतदेह ससून येथे नेण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2020 5:34 pm

Web Title: pune coronavirus ambulance one person dead nck 90 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुण्यात ‘मे’ अखेरपर्यंत ५,००० करोनाबाधित रुग्ण असतील – महापालिका आयुक्त
2 नागरिकांच्या अडचणीच्या काळात नगरसेवक गायब
3 घरपोच सेवा देण्यासाठी हॉटेलचालक सज्ज
Just Now!
X